मान्सूनपूर्व कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा, स्वच्छतेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

शहरातील गृहसंकुलाशी समन्वय साधून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच प्रत्येक प्रभाग समिती निहाय उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक केलेल्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मान्सूनपूर्व कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा, स्वच्छतेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
मान्सूनपूर्व कामांचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून आढावाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:41 AM

ठाणे : शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देवून पावसाळ्यापूर्वी स्वच्छता, सार्वजनिक शौचालय साफसफाई, रस्त्याची साफसफाई, फुटपाथ स्वच्छता तसेच रस्त्यावरील डेब्रिज तात्काळ उचलण्याच्या कडक सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे (Sanjay Herwade) यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. महापालिकेच्या कै.अरविंद पेंडसे सभागृहात बुधवारी त्यांनी सर्व उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, निरीक्षक यांच्या समवेत तातडीने बैठक घेवून संपूर्ण स्वच्छता, साफसफाई कामाचा आढावा (Review) घेतला. शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती नळ व्यवस्था, साफसफाई, रस्त्यावरील साफसफाई, तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, डेब्रिज उचलणे तसेच परिसर स्वच्छता तसेच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याबाबत कडक शब्दात सूचना अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. (Review of pre-monsoon works by Additional Municipal Commissioner instructions for completing the cleaning work with priority)

अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश

दरम्यान शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाबाबतही सतर्क राहण्याच्या कडक सूचनाही त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. यासोबतच शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधितांना दिले. शहरातील गृहसंकुलाशी समन्वय साधून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच प्रत्येक प्रभाग समिती निहाय उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक केलेल्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (Review of pre-monsoon works by Additional Municipal Commissioner instructions for completing the cleaning work with priority)

इतर बातम्या

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Phone Tapping : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना समन्स

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.