AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांचा सल्ला

अनेक कामं मला करायचे होते. त्यासाठी मी संधी मागत होते. परंतु ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही, असा आरोप मनीषा कायंदे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांचा सल्ला
Updated on: Jun 18, 2023 | 11:23 PM
Share

प्रतिनिधी, ठाणे : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदा आनंद दिघे यांना अभिवादन केले. अनेक जिल्ह्यातील महिला पदाधिकारी आनंद मठ येथे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला पदाधिकारी यांच्याकडून मनीषा कायंदे यांचे स्वागत करण्यात आले. मनीषा कायंदे म्हणाल्या, अनेक वर्षांनी शिवसेना पक्षात आहे. परंतु त्यानंतर मला या सत्तांतराच्या काळानंतर कधीही संधी देण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी माझे प्रश्न आहेत, ते डावलले जायचे. अनेक काम मला करायचे होते. त्यासाठी मी संधी मागत होते. परंतु ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही, असा आरोप मनीषा कायंदे यांनी केला.

या ठिकाणी अनेक पक्षप्रवेश होत आहे. ते पाहून तसेच राज्याचीदेखील विकास होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास होत असताना मला देखील विकासामध्ये यायचं होते. त्यासाठी मी आज निर्णय घेतला आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश घेतलेला आहे, असं मनीषा कायंदे यांनी स्पष्ट केले.

कचऱ्यातून वीजनिर्मिती होते

अनेक लोक टीका करत आहेत. या ठिकाणी कचरा म्हणून उल्लेख करतात. परंतु माझी मी सांगू इच्छिते की, या कचऱ्यातूनच मोठी ऊर्जा ही निर्माण होते. असे प्रत्युत्तर संजय राऊत यांना दिले. नक्कीच महिलांचे अनेक प्रश्न आहेत. ते मी या ठिकाणी मार्गे लावणार आहे. महिलांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची जबाबदारी देतील ते मी घेण्यासाठी तयार आहे.

खरा फिडबॅक दिला जात नव्हता

पक्ष प्रमुखांशी बोलताना अडचण यायची. खरा फिडबॅक दिला जात नव्हता. पक्ष प्रमुखांशी कुणी बोलू शकत नसेल. कुणी कार्यकर्त्यांकडून पैसे उकळले जातात. बाळासाहेबांची शिवसेना इथ आहे म्हणून मी येथे आहे. कचरा निघून जातो. कचऱ्यातून वीजनिर्मिती होते. ही कशी निर्मिती होते ते तुम्ही बघा.

२४ बाय सीएम आपल्याला मिळाले आहेत. काम करायचे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अजेंडा चालवायचा यात मला रस नव्हता. महिला, युवकांसाठी काम करत राहणार. एकनाथ शिंदे आधीही नेते होते. आताही नेते आहेत. राज्याचे आशास्थान बनले आहे, असंही मनीषा कायंदे यांनी म्हंटलं.

एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.