AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेवर येत्या रविवारी कळवा-मुंब्रा दरम्यान 10 तासांचा विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवरील दिवा आणि ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या लाइनसाठी येत्या रविवाी 26 सप्टेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी कळवा आणि मुंब्रा दरम्यान 10 तासाचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. (special block on Central Railway on Sunday)

मध्य रेल्वेवर येत्या रविवारी कळवा-मुंब्रा दरम्यान 10 तासांचा विशेष ब्लॉक
Central Railway
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 4:18 PM
Share

ठाणे: मध्य रेल्वेवरील दिवा आणि ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या लाइनसाठी येत्या रविवाी 26 सप्टेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी कळवा आणि मुंब्रा दरम्यान 10 तासाचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबरमध्येही ही चार ते पाच तासाचे 6 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या शिवाय नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी २०२२ मध्येही पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहेत. (special block on Central Railway on Sunday)

ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 (10 तास) दरम्यान कळवा -मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. यामुळे त्याचा लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

लोकल अशा धावणार

कल्याण येथून सकाळी 7.27 ते संध्याकाळी 5.40 पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल. पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशीराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची उपनगरीय सेवा सकाळी 7.38 वा. असेल.

ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी 6.02 वा. असेल. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक प्रभावित क्षेत्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे, असं रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

ठाण्यात वाहतूक कोंडी

दरम्यान, आज ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गेल्या 3 तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणं प्रवाशाना कठिण होऊन बसलं आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.

खड्डे बुजवले तरीही परिस्थिती जैसे थे

दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे. (special block on Central Railway on Sunday)

संबंधित बातम्या:

ठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा

धो डाला! ठाणे, पालघरमध्ये पावसाचं धुमशान; सकाळपासून जोरदार हजेरी

कल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

(special block on Central Railway on Sunday)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.