VIDEO : उल्हानगरमधील फिल्मी थरार, चोरी पकडली जाण्याच्या भीतीने चोराची थेट नदीत उडी, व्हिडीओ व्हायरल

दुचाकी चोरी केल्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने चोराने थेट नदीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. (Ulhasnagar Theft Jump Into River)

VIDEO : उल्हानगरमधील फिल्मी थरार, चोरी पकडली जाण्याच्या भीतीने चोराची थेट नदीत उडी, व्हिडीओ व्हायरल
Ulhasnagar theft jump


उल्हासनगर : दुचाकी चोरी केल्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने चोराने थेट नदीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. उल्हानगरमध्ये हा सर्व फिल्मी प्रकार पाहायला मिळाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओही समोर आला आहे. या चोराला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. (Ulhasnagar Theft Jump Into River Video Viral)

नेमकं काय घडलं? 

उल्हासनगरातून दोन दुचाकी चोरांनी एका दुचाकीची चोरी केली. ही चोरी केल्यानंतर ते चोर अंबरनाथकडे येत होते. त्यावेळी त्या चोरलेल्या दुचाकीचे मालक दुसऱ्या गाडीवरुन या चोरट्यांचा पाठलाग करत होते. हे चोरटे अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या जवळ असलेल्या साईबाबा मंदिराजवळ आले.

त्यावेळी त्या चोरांची गाडी स्लिप झाली. यावेळी एक चोरटा पळून गेला. तर दुसऱ्याने पळत जाऊन थेट वालधुनी नदीत उडी मारली. हा सर्व फ्लिमी प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यावेळी दुचाकीचा मालक आणि स्थानिक लोकांनी त्याला नदीतून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आला आहे. (Ulhasnagar Theft Jump Into River Video Viral)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

दोन चिमुकल्यांची थेट पंतप्रधानांना साद; शाळा बंद राहिल्यामुळे मुलांनी बनवला धम्माल व्हिडिओ

VIDEO: अजितदादा आणि टोपे इन अ‍ॅक्शन; दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार

Maratha Morcha: बीडमध्ये मराठा समाजाचा एल्गार; परवानगी नाकारुनही मोर्चाची जय्यत तयारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI