वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला कुठे कुठे फटका?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला खाते उघडण्यासाठी शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने मदत केली. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाल्यात जमा आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. काँग्रेसच्या या अपयशामागे बरीच कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्वाचे कारण काँग्रेसला मित्रपक्षांना सोबत घेण्यात आलेले अपयश. वंचित बहुजन […]

वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला कुठे कुठे फटका?
Follow us
| Updated on: May 26, 2019 | 5:53 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला खाते उघडण्यासाठी शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने मदत केली. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाल्यात जमा आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. काँग्रेसच्या या अपयशामागे बरीच कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्वाचे कारण काँग्रेसला मित्रपक्षांना सोबत घेण्यात आलेले अपयश. वंचित बहुजन आघाडीला (VBA) सोबत न घेतल्याने काँग्रेस आघाडीला मोठे नुकसान झाल्याचं चित्र आहे.

काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत जागा वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 2014 च्या मोदी लाटेत निवडून आलेले खासदारही यावेळी पराभूत झाले. यूपीएच्या मतदानाची आकडेवारीही यावेळी घसरली. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेऊ शकल्याने महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला 15 ठिकाणी मोठा फटका बसला आहे. साधारण 8-9 ठिकाणी तर वंचितच्या मतांनी काँग्रेस उमेदवारांना विजयापासून दूर ठेवले. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम (AIMIM) यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीला जवळपास 14 टक्के मते मिळाली आहेत. तसेच औरंगाबाद येथील जागाही काबीज केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे असे 15 उमेदवार आहेत ज्यांना साधारण 90 हजार ते 3 लाखांपर्यंत मते मिळाली आहेत. या सर्व ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवात या मतांचा मोठा वाटा राहिला.

सांगली 

  • विजयी –  संजयकाका पाटील (भाजप) – 5 लाख 08 हजार 995
  • पराभूत –  विशाल प्रकाशबापू पाटील (स्वाभिमानी + काँग्रेस) – 3 लाख 44 हजार 643
  • वंचितची मते – गोपीचंद पडळकर (वंबआ) – 3 लाख 00234

अकोला

  • विजयी – संजय शामराव धोत्रे (भाजप) – 5 लाख 54 हजार 444
  • पराभूत – हिदायतुल्लाह बराकातुल्लाह पटेल – 2 लाख 54 हजार 370
  • वंचितची मते – प्रकाश आंबेडकर – 2 लाख 78 हजार 848 मते
  • भाई बी. सी. कांबळे (बसप) – 7 हजार 780

हिंगोली 

  • विजयी – हेमंत पाटील (शिवसेना) – 5 लाख 86 हजार 312
  • पराभूत – सुभाषराव बापूराव वानखेडे (काँग्रेस) – 3 लाख 8 हजार 456
  • वंचितची मते – मोहन राठोड (वंबआ) – 1 लाख 74 हजार 51
  • संदेश रामचंद्र चव्हाण (अपक्ष) – 23 हजार 690
  • डॉ. दत्ता मारोती धानवे (बसप) – 5 हजार 550

बुलढाणा 

  • विजयी – प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) – 5 लाख 21 हजार 977
  • पराभूत – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगे (काँग्रेस) – 3 लाख 88 हजार 690
  • वंचितची मते – बळीराम सिरस्कार (वंबआ) – 1 लाख 72 हजार 627
  • अब्दुल हाफिज अब्दुल अजिज (बसप) – 6 हजार 565

सोलापूर 

  • विजयी – डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (भाजप) – 5 लाख 24 हजार 985
  • पराभूत – सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) – 3 लाख 66 हजार 377
  • वंचितची मते – बाळासाहेब आंबेडकर (वंबआ) – 1 लाख 70 हजार 7

नांदेड 

  • विजयी – प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) – 4 लाख 86 हजार 806
  • पराभूत – अशोक शंकरराव चव्हाण (काँग्रेस) – 4 लाख 46 हजार 658
  • वंचितची मते – यशपाल भिंगे (वंबआ) – 1 लाख 66 हजार 196
  • नोटा (NOTA) – 6 लाख 114
  • अब्दुल रईस अहमद (आंबेडकर नॅशनल काँग्रेस) – 4 लाख 147

परभणी 

  • विजयी – संजय हरिभाऊ जाधव (भाजप)– 5 लाख 38 हजार 941
  • पराभूत – राजेश उत्तमराव विटेकर (काँग्रेस) – 4 लाख 96 हजार 742
  • वंचितची मते – आलमगीर खान (वंबआ) – 1 लाख 49 हजार 946
  • कॉ. राजन क्षीरसागर (CPI) – 17 हजार 095

हातकणंगले 

  • विजयी – धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना) – 5 लाख 85 हजार 776
  • पराभूत – राजू शेट्टी (स्वाभिमानी+काँग्रेस) – 4 लाख 89 हजार 737
  • वंचितची मते – अस्लाम सय्यद (वंबआ) – 1 लाख 23 हजार 419

लातूर 

  • विजयी – सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप) – 6 लाख 61 हजार 495
  • पराभूत – मच्छिंद्र गुणवंतराव कामत (काँग्रेस) – 3 लाख 72 हजार 384
  • वंचितची मते – राम गरकर (वंबआ) – 1 लाख 12 हजार 255

गडचिरोली-चिमूर 

  • विजयी – अशोक महादेवराव नेते (भाजप) – 5 लाख 19 हजार 968
  • पराभूत – डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी (काँग्रेस) – 4 लाख 42 हजार 442
  • वंचितची मते – रमेश गजबे (वंबआ) – 1  लाख 11 हजार 468
  • हरिचंद्र नागोजी मंगम (बसप) – 28 हजार 104
  • नोटा (NOTA) – 24 हजार 599

नाशिक 

  • विजयी – हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) – 5 लाख 63 हजार 599
  • पराभूत – समीर भुजबळ (राष्ट्रवादी) – 2 लाख 71 हजार 395
  • वंचितची मते – पवन पवार (वंबआ) – 1 लाख 9 हजार 981

उस्मानाबाद 

  • विजयी -ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर (शिवसेना) – 5 लाख 96 हजार 640
  • पराभूत – राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (काँग्रेस) – 4 लाख 69 हजार 74
  • वंचितची मते – अर्जुनदादा सलगर (वंबआ) – 98 हजार 579
  • नोटा (NOTA) – 10 हजार 24

यवतमाळ-वाशीम 

  • विजयी – भावना पुंडलिकराव गवली (शिवसेना) – 5 लाख 42 हजार 98
  • पराभूत – माणिकराव ठाकरे (काँग्रेस) – 4 लाख 24 हजार 159
  • वंचितची मते – प्रविण पवार (वंबआ) – 94 हजार 228
  • वैशाली सुधाकर येडे (प्रहार जनशक्ती पक्ष) – 20 हजार 620

बीड 

  • विजयी – प्रितम गोपीनाथ मुंडे (भाजप) – 6 लाख 78 हजार 175
  • पराभूत – बजरंग मनोहर सोनवणे (राष्ट्रवादी) – 5 लाख 9 हजार 807
  • वंचितची मते – विष्णू जाधव (वंबआ) – 92 हजार 139

रावेर 

  • विजयी – रक्षा निखिल खडसे (भाजप) – 6 लाख 55 हजार 386
  • पराभूत – डॉ. उल्हास वासुदेव पाटील (काँग्रस) – 3 लाख 19 हजार 504
  • वंचितची मते – नितीन कांडेलकर (वंबआ) – 88 हजार 365
  • नोटा (NOTA) – 9 हजार 216

औरंगाबाद

  • विजयी – इम्तियाज जलिल (वंबआ) – 3 लाख 89 हजार 42
  • पराभूत : चंद्रकांत खैरे (शिवसेना) – 3 लाख 84 हजार 550
  • पराभूत :सुभाष झांबड (काँग्रेस) – 91 हजार 789

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.