VIDEO: वर्ध्यात एकीकडे नवरी घोड्यावर चढली, दुसरीकडे ‘करवल्याने’ दागिण्यांची बॅग पळवली

वर्धा शहराला लागून असलेल्या नालवाडी येथे एका लग्नात चोरीचा प्रकार घडलाय.

VIDEO: वर्ध्यात एकीकडे नवरी घोड्यावर चढली, दुसरीकडे 'करवल्याने' दागिण्यांची बॅग पळवली

वर्धा : अनेकदा लग्नाच्या धामधुमीत वऱ्हाडी मंडळी इतके तल्लीन होऊन जातात की महत्त्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष होतं. त्याचाच फायदा घेत वर्धा शहराला लागून असलेल्या नालवाडी येथे एका लग्नात चोरीचा प्रकार घडलाय. उभाड कुटुंबातील एका मुलीचं लग्न शहराच्या ‘इव्हेंट’ या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलं. एकीकडे विवाहाची जय्यत तयारी सुरू होती, तर दुसरीकडे चोरटे आपला बेत साधण्यासाठी दागिने आणि रोकड वर नजर ठेवून होते. अशातच लग्नाच्या मुहूर्तावर चोरट्याने लहान मुलाचा वापर करत दागिण्यांसह रोकडची बॅग लंपास केलीय. या घटनेनंतर वऱ्हाड्यांमध्ये एकच खळबळ उडाली (Theft at the Marriage in Wardha using child).

लग्नाच्या पूर्वसंध्येला उभाड कुटुंबाने मुलामध्ये आणि मुलीमध्ये कोणताही भेद पाळत नसल्याचं दाखवत आपल्या मुलीची घोड्यावर मिरवणूक काढली. मुलीच्या मिरवणुकीची संपूर्ण शहरात चर्चा असताना दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा पार पडला. मात्र, या लग्नादरम्यान संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर चोरट्यांनी विरजन घातलं.

लग्न समारंभातील आनंदावर विरजण घालणाऱ्या या घटनेत अल्पवयीन मुलासोबत एका मोठ्या व्यक्तीचा सहभाग होता. बाल गुन्हेगारी वाढण्यास प्रवृत्त करणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान निर्माण केलं आहे. सराईत चोरट्यांची ही टोळी मोठ्या शहरातील असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

ही घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली असून पोलिसांनी आज (8 फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत 8 तोळे सोनं आणि 1 लाख रुपये रोख असा एकूण 3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय, अशी माहिती सेवाग्रामच्या पोलीस निरिक्षक कांचन पांडे यांनी दिली. या घटनेमुळे उभाड कुटुंबाच्या रंगाचा बेरंग झाला. पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र, या घटनेने लग्नसोहळ्यात सावध राहण्याची गरज दाखवून दिलीय.

हेही वाचा :

नांदेडच्या बँकेत हॅकरचा दरोडा, 14 कोटी लुटले, तुमचे अकाऊंट चेक केलात?

नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीसाठी असं काही केलं की आता थेट रवानगी जेलमध्ये!

दादरमध्ये सेना भवनासमोरील दुधाच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला

व्हिडीओ पाहा :

Theft at the Marriage in Wardha using child

Published On - 11:48 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI