Vikram Gokhale: ‘या’ चित्रपटाने दिली होती विक्रम गोखले यांना ओळख, लहानपणापासूनच मिळाले अभिनयाचे बाळकडू

नटसम्राट विक्रम गोखले यांनी आज अखेरचा श्वास घेतला. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान हे बहुमूल्य आहे. जाणून घेऊया त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीबद्दल.

Vikram Gokhale: 'या' चित्रपटाने दिली होती विक्रम गोखले यांना ओळख, लहानपणापासूनच मिळाले अभिनयाचे बाळकडू
विक्रम गोखले Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 3:38 PM

मुंबई, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन (Died) झाले. त्यांना 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. विक्रम गोखले यांनी शंभरहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये (Film) काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि संवाद वितरणासाठी ओळखले जाणारे अभिनेते विक्रम गोखले यांना 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा सुपरहिट चित्रपट ‘हम दिल चुके सनम’ या चित्रपटामधील विक्रम गोखले यांची भूमिका चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहे.

विक्रम गोखले यांना लाभला आहे अभिनयाचा वारसा

विक्रम गोखले हे केवळ हिंदी चित्रपटातच नाही तर मराठी नाटक आणि टीव्ही मालिकांमधले लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1945 रोजी एका अभिनय संपन्न  कुटुंबात झाला. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट कलाकार चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत. त्यांची आजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. याशिवाय त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बालकलाकार होत्या.

रागीट बापाच्या भूमिकेने मिळाली अधिक प्रसिद्धी

विक्रम गोखले यांनी शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेतून ते अधिक प्रसिद्ध झाले. त्यांनी एका रागीट, पुराणमतवादी आणि कडक वडिलांची भूमिका साकारली जी अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. याशिवाय तुम बिन या चित्रपटातील विक्रम गोखले यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भूल भुलैया, हिचकी, निकम्मा, अग्निपथ आणि मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडला.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना अनेक वेळा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2011 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला, तर मराठी चित्रपट ‘अनुमती’साठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे. अभिनयासोबतच त्यांनी ‘आघात’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.