AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परिवहन मंत्र्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश या, एका निर्णयाने एसटीचे वाचणार १२ कोटी रुपये

सध्या एसटीच्या २५१ आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्याने दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल एसटीला लागत असते. या डिझेलवर आता कंपन्यांना सवलत द्यावी लागणार आहे.

परिवहन मंत्र्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश या, एका निर्णयाने एसटीचे वाचणार १२ कोटी रुपये
msrtc-new-bus
| Updated on: Jul 30, 2025 | 8:13 PM
Share

गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कडून डिझेल इंधन खरेदी करत आहे. सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी १० कोटी ७७ लाख लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक ( bulk purchase customer) असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या. परंतु एसटी महामंडळाने वारंवार विनंती करूनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता. परंतू, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये मध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली.

इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन-चार बैठका घेण्यात आल्या. तसेच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खाजगी कंपन्या सोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवली.

अशी होणार अतिरिक्त बचत

या सर्वांचा परिणाम म्हणजे संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार येत्या १ ऑगस्ट पासून मुळ सवलत दरात प्रति लिटर ३० पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे. सध्या एसटीच्या २५१ आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्याने दररोज सरासरी १० कोटी ७७ लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कडून पुरविण्यात येते. भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे. त्यामुळे प्रति लिटर ३० पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.

“एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या, ज्या ठिकाणी पैशाची बचत आणि काटकसर करणे शक्य आहे, त्या-त्या ठिकाणी बचत आणि काटकसर केली पाहिजे! तसेच तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, या दोन्ही प्रयत्नातून भविष्यात एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल!” असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.