
आज पंढरपूर येथे जन आक्रोश मोर्चा. मस्साजोगवरून देशमुख कुटुंबीय पंढरपूरकडे रवाना. संतोष देशमुख कुटुंबीय होणार सहभागी. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी व मुलगा विराज होणार सहभागी. पिंपरी चिंचवड आरटीओला 18 कोटींचा महसूल. पिंपरी चिंचवड आरटीओ मागील वर्षी एकूण दोन लाख 40 हजार 466 जणांनी लर्निंग आणि ड्रायव्हिंग लायसन टेस्ट दिली. यामधून आरटीओला 17.86 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. यात 92 हजार 699 ज्यांनी लर्निंग आणि एक लाख 47 हजार 667 लोकांनी ड्रायव्हिंग टेस्ट दिली. 50 हजार शेतकऱ्यांचे 286 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 23 लाख क्विंटल धान खरेदी. दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. मार्केटिंग फेडरेशनने थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार.
Pushpak Express Fire News: जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक रेल्वे दुर्घटनेत या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 जण जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र जखमींपैकी चौघांची प्रकृती अत्यंत नाजूक असून मृतांचा आकाडाही 15वर जाण्याची शक्यता असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
आग लागल्याची अफवा परसली अन् अनेकांनी आपला जीव गमावला. आग लागल्याच्या अफवेमुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. अन् त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अफवेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
Pushpak Express Fire News: जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक रेल्वेत आग लागल्याची अफवा परसली आणि अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Pushpak Express Fire News: जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक रेल्वेनं अचानक ब्रेक मारल्यानं रेल्वेच्या चाकांमधून आगीच्या ठिणक्या उडाल्या. त्यामुळे आग लागल्याची अफवा परसली आणि अनेकांनी उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. तर अनेकजण जखमी झाले. 12 जण जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Jalna Pushpak Express Fire News: जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या. मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. 6 ते 7 जखमींना ग्रामीण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या. मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआय लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे.
मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा जेडीयूने काढला. मणिपूरमध्ये जेडीयूचे 6 आमदार निवडून आले होते. मात्र त्यातल्या 5 आमदारांनी यापूर्वीच भाजपला समर्थन दिलं आहे. आता बाकी असलेल्या एका आमदाराने पाठिंबा मागे घेतला आहे.
जळगावच्या मास्टर कॉलनी परिसरातील अरमान टेन्ट हाऊसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये टेन्ट हाऊस साहित्य कागून लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग कशामुळे लागली याचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण आगीमुळे धुराचे मोठ्या प्रमाणावर लोट बाहेर पडत असल्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले की, भारताला बाहेरून धोका नसून देशातूनच धोका आहे. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांनी एकतेचे महत्त्व सांगितले. तसेच फुटीरतावादी विधानांचा प्रतिकार करण्यास सांगितले.
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथे रेल्वेचा हद्दीतील अनधिकृत घरावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. स्थानिकांकडून या कारवाईविरोधात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. दगडफेकीत पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. आंदोनलाची परवानगी नसल्यामुळे 20 ते 25 जणांना जोगेश्वरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला रेल्वेचा हद्दीतील अनधिकृत घरावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असता त्यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
अभिनेता सैफ अली खान याला चोरट्याच्या हल्ल्यानंतर रिक्षातून लीलावतीत नेऊन त्याचे प्राण वाचविणारे रिक्षा चालक भजनसिंग राणा यांनी काल लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेतली आहे. सैफने भजनसिंग राणा यांचे आभार मानले आहेत.
धुळ्यात महसूल कर्मचारी मारहाण प्रकरणी तिसऱ्या दिवशीही तहसील कार्यालय बंदच ठेवण्यात आले आहे. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला तीन दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. मारहाण करणाऱ्याला अटक करा या मागणीसाठी तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. मात्र तहसीलदार कार्यालय बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
सैफवर झालेल्या हल्ल्याननंतर सैफला खाजगी सुरक्षा देण्यात आली आहे. रोनित रॉय यांची सुरक्षा व व्यवस्था अशी खाजगी कंपनी आहे. याच कंपनीकडून सैफच्या सुरक्षेसाठी खाजगी बॉडीगार्ड 24 तास तैनात असणार आहे.
गोंदियातील कचारगड यात्रा 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. आदिवासी कुलदैवतेचे श्रद्धास्थान म्हणून कचारगड देवस्थान प्रसिद्ध आहे.
या यात्रेत 16 राज्यातील भाविक दर्शन करण्यासाठी येत असतात. यात्रेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सर्व सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.
बीड: संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराड याची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर वाल्मिकला बीडच्या कारागृहात रवानगी करणार आहेत.
रत्नागिरी- साळवी कुटुंबाचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांची एसीबी चौकशी पूर्ण झाली आहे. रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जवळपास दीड तास दिनकर सावंत यांची चौकशी झाली. भागीदार असताना जी कामे केली त्या निविदांचे कागदपत्र एसीबी कार्यालयात जमा केले. “राजन साळवी यांच्याविषयी मला काही विचारलं नाही. वर्क ऑर्डर संदर्भातील कागदपत्रे एसीबी कार्यालयात दिली आहेत. जे मागितलं ते सर्व एसीबी कार्यालयात दिलं आहे,” असं दिनकर सावंत म्हणाले.
सैफ अली खानच्या घराला नवी डोअर इंटरकॉम प्रणाली बसवण्यात आली आहे. सैफच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी अत्याधुनिक डोअर इंटरकॉम प्रणाली बसवण्यात आली आहे. एका प्रतिष्ठित कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी हे इंटरकॉम बसवण्याचं काम पूर्ण केलं. घराच्या मुख्य दरवाजावर सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी ही प्रणाली बसवण्यात आली आहे.
पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये 24 संशयित रुग्ण दाखल झाले असून महापालिकेनं शोधमोहीम सुरू केली. या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (GBS ) या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि कार्यवाहीयाबाबत महापालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आमदार हेमंत रासने भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
वांद्रे पोलीस अधिकाऱ्यांकडून सैफ अली खानच्या सद्गुरु शरण इमारतीची पाहणी करण्यात आली. इमारतीत तैनात पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी सुमारे 15 मिनिटे इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली. उपस्थित पोलिसांना सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेश दिले. सैफ अली खानच्या स्टेटमेंटबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला.
कारने बाळासह मावशीला उडवले, पिंपरी चिंचवडच्या सोसायटीतील अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पण पोलिसांनी या प्रकरणात अजब दावा केला आहे. पोलीस म्हणतात अपघात इतका गंभीर नाही.
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरणासमोर सुनावणी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या बडतर्फी विरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरणासमोर सुनावणी होईल. केंद्र सरकारने पूजा खेडकरला सप्टेंबर २०२४ मध्ये खोटी कागदपत्र सादर केलेल्या आरोपाखाली बडतर्फ केले होते.
खंडणी आणि हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. तर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.आज न्यायालयासमोर ही सुनावणी होत आहे. कराड याला थोड्याचवेळापूर्वी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
पिकविमा,पिक कर्ज त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र वारंवार इंटरनेटच्या अडचणी आणि सर्वर डाऊन असल्याने या प्रणालीमध्ये अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे जालना जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिक पाहणी पासून वंचित असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शासनाने ई-पीक पाहणीची मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ६३ वर भीषण अपघात झाला. भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक गोळापूर घाटात पलटी झाला. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.
वाल्मिक कराड याची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे बीड जवळील मांजरसुंबा येथे 9 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. तर त्याने या परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जमिनीवर त्याला आलिशान रिसॉर्ट सुरू करायचा असल्याचे समोर येत आहे.
रायगडच्या उरणमध्ये ‘ बर्ड फ्लू ‘चा शिरकाव झाला आहे. उरणच्या चिरनेर गावात अनेक कोंबड्यांचा झाला मृत्यू, कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची वेळ कुक्कुटपालन व्यावसायिकांवर आली आहे. गावात प्रशासनाकडून 2 टीमही तैनात करण्यात आल्या आहेत.
रंकाळा तलाव प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या आदेशाला कोल्हापूरकरांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. रंकाळा तलावात सर्रासपणे कपडे, वाहन आणि जनावरं धुतली जात आहेत. प्रदूषणामुळे रंकाळा तलावातील मासे मरण्याचे सत्र सुरूच आहे.
रंकाळा तलाव प्रदूषण रोखण्यासाठी तलावात कपडे ,जनावर आणि वाहन धुणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र महानगरपालिकेचा आदेश फक्त कागदावरच आहे की काय असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
सैफ अली खान प्रकरणात पोलीस आज आरोपीला वरळी आणि इतर ठिकाणी घेऊन जाऊ शकतात.
सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या सर्व ठिकाणी पोलीस आरोपीला घेऊन जाणार आहेत.
सैफ अली खानच्या घरी घडलेल्या घटनेनंतर आरोपी ज्या लोकांना भेटला, त्या लोकांचीही पोलिस चौकशी करत आहेत.
दहशत माजवणाऱ्या गुंडांना पुणे पोलीसांनी बसवली जरब, गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुंडांची कोंढवा पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. साळवे गार्डन परिसरात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसांचा दणका. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कोंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये व्हीआयपी कॉलेजच्या रस्त्यावरून कोंढवा पोलिसांनी धिंड काढली.
सामंत दावोसमधून आमदार फुटणार असा दावा करत आहेत… उदय सामंत यांना ताबडतोब मुंबईला बोलवा… उदय सामंत दावोसला शिंदे यांचे आमदार फोडायला गेलेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
जालन्यात जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. मुकेश उर्फ अशोक भिकाजी तरकसे असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नावं असून या कारवाईत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी मुकेश उर्फ अशोक तरकसे याने तालुका जालना पोलिस ठाणे हद्द आणि सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या 5 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपीकडून जबरी चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.
रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का… ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरीच्या तालुकाप्रमुखांचा राजीनामा… विनायक राऊतांचे नितटवर्तीत म्हणून प्रदीप साळवींची ओळख… प्रदीप साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा…
उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्रीच्या अंगणात बॅनरवॉर… आमदार सदा परब, वरून सरदेसाई यांच्या बॅनरच्या समोरच कुणाल सरमळकर यांनी लावले बॅनर… संपूर्ण वेस्टन एक्सप्रेस हायवे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर शिवोत्सव साजरा करण्याचे बॅनर चर्चेचा विषय…
खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने प्रयागराज महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे.
लिलावती रुग्णालयातील स्टाफ सैफ अली खानच्या घरात दाखल. रुटीन चेकअप, ब्लड प्रेशर मापन आणि औषध वेळेवर देण्यासाठी स्टाफ आल्याची माहिती. सैफ अली खानचा मुलगा जहागीर शाळेत जाण्यासाठी निघाला.
इमारतीमधील पार्किंगच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू. सोसायटी चेअरमनसह कुटुंबाने सदनिकाधारक व मुलांना केलेल्या जबर मारहाणीत एकाचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न. पंचवटी पोलिसात बापासह दोन मुले अशा तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल. बुध्दन लक्ष्मण विश्वकर्मा यांचा खुनी हल्ल्यात मृत्यू.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर. राज ठाकरे नाशिकमध्ये तीन दिवस करणार मुक्काम. राज ठाकरेंच्या दौऱ्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. नाशिक दौऱ्यादरम्यान पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना देणार असल्याची ही माहिती. 23 जानेवारी पासून तीन दिवस नाशिक मध्ये राहणार मुक्कामी.