शेतीच्या वादातून दोन गटात वाद, हात, पाय, पोट आणि डोक्यात वार

शेतीच्या वादातून लातुर येथे दोन गटात जोरदार हाणामारी (Two groups fights for farming land) झाली. या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

शेतीच्या वादातून दोन गटात वाद, हात, पाय, पोट आणि डोक्यात वार

लातूर : शेतीच्या वादातून लातुर येथे दोन गटात जोरदार हाणामारी (Two groups fights for farming land) झाली. या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूरमधील डांगेवाडी या ठिकाणी (Two groups fights for farming land) ही धक्कादायक घटना घडली.

शेतीच्या वादातून करण्यात आलेला हा हल्ला जिल्ह्यात सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. या हल्ल्यादरम्यान जवळपास 11 जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात जखमींच्या हात, पाय, डोकं आणि पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत. त्यामुळे हे सर्वजण गंभीर जखमी आहेत.  या सर्व जखमींवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन गटात झालेल्या हाणामारी नक्की कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलिसांकडून तपास  सुरु आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे लातूर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असतान त्या ठिकाणीही या दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यामुळ रुग्णालय परिसरातही मोठा गोंधळ उडाला. यामुळे रुग्णालया परिसरता  रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर काहींना अटक करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *