विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

विजेचा शॉक लागून आज (29 सप्टेंबर) सकाळी नाशिक येथे सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू (Two women die in electric shock) झाला.

विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : विजेचा शॉक लागून आज (29 सप्टेंबर) सकाळी नाशिक येथे सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू (Two women die in electric shock) झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नाशिक येथील उत्तमनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सोजाबाई केदारे आणि सिंधू केदारे असं मृत (Two women die in electric shock) झालेल्यांची नावं आहेत.

सोजाबाई केदारे या आजी सकाळी आपल्या घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालत होत्या. यावेळी अचानक त्यांचा धक्का विजेच्या तारेला लागला आणि त्यांना शॉक बसला. हे पाहून मदतीसाठी धावून गेलेल्या सुनबाई सिंधू केदारे यांनाही शॉक लागला. आजी आणि आईला विजेचा शॉक लागल्याचे पाहून मुलगी राणी केदारे त्यांना वाचवण्यासाठी गेली. मात्र तिलाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने ती तिथेच पडली.

त्यानंतर मुलगा शुभमच्या हे लक्षात येताच तोही मदतीसाठी धावला. पण त्यालाही विजेचा धक्का बसला आणि तो गंभीर जखमी झाला. या घटनेत आजी आणि आईचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा आणि मुलगी गंभीर भाजले आहेत. या दोघांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही दोन्ही मुलं मृत्युशी झुंज देत आहेत. मात्र सिडको परिसरातील विजेच्या तारेंचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामागे ही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. येथील विजेच्या तारा भूमिगत कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *