AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून राज्यात एमआयएमची ताकद वाढली; उदय सामंत यांचं मोठं विधान

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता मुंबईचा नवा महापौर कोणा होणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, यावर उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

...म्हणून राज्यात एमआयएमची ताकद वाढली; उदय सामंत यांचं मोठं विधान
uday samant Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 18, 2026 | 9:31 PM
Share

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना शिंदे गटाला देखील मोठं यश मिळालं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तर शिवसेना शिंदे गट या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुंबईमध्ये देखील भाजपला चांगलं यश मिळालं, मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत, मात्र जरी असं असलं तरी देखील भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही, त्यामुळे मुंबईत महापौरपदासाठी आता भाजपला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये नेऊन ठेवले आहेत. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून भाजपकडे अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

महापालिका निवडणुका पार पडल्या,  राज्यभरात शिवसेना  नंबर दोनवर आहे.  आम्हाला राज्यात 402 ठिकाणी विजय मिळाला आहे. आमच्यावर जे आगपाखड करत होते, त्यांना 100 देखील जागा मिळाल्या नाहीत. आम्ही नगरसेवकांना हाॅटेलमध्ये ठेवलं त्यावरून उलट सुलट चर्चा सुरूआहे.  मात्र जे पूर्वी झालं तसं आता काही होणार नाही. आम्ही युतीत निवडणुका लढवल्या आहेत,  काही लोकं आमची नाहक बदनामी करत आहेत.  मात्र नाॅट रिचेबल कोण आहे? हे येणाऱ्या काळात कळेल. 2019 मध्ये उठाव झाला, त्यातून काहीतरी आत्मचिंतन करणं गरजेचं होतं, असं म्हणत त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  प्रत्येक पक्षातील नेत्यांना वाटतं आपला महापौर व्हावा आम्ही माध्यमांमध्ये काही चर्चा पाहात आहोत. निवडणुकीत जिथे कुठे आमचं चुकलं, त्याचं आम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करू,  ज्यानी 2019 मध्ये निवडणुकीत युतीत लढून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांच्यामुळे राज्यात एमआयएमची ताकद वाढली.  मुंबईतही वाढली, असा हल्लाबोल यावेळी उदय सामंत यांनी केला आहे. ही आमची उठावानंतर पहिली महापालिका निवडणूक होती,  अनेक ठिकाणी चांगला निकाल आला, जिथे कमी पडलो त्याचं आत्मपरीक्षण करू, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.