उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये जाऊन पहिल्यांदाच जाहीर माफी मागितली!

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale apologize) यांनी पहिल्यांदाच जाहीर माफी मागितली आहे.

उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये जाऊन पहिल्यांदाच जाहीर माफी मागितली!

सातारा : माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale apologize) यांनी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा भेटीगाठी सुरु केल्या आहेत. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale apologize) यांनी पहिल्यांदाच जाहीर माफी मागितली आहे. महत्त्वाचं म्हणजे कराड शहरात जाऊन उदयनराजे भोसले यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप जिल्हाध्यक्षाने कराडमधील प्रचारसभेत मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले यांनी माफी मागितली. इतकंच नाही तर त्या प्रचारसभेवेळी जर आपण उपस्थित असतो, तर भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचलं असतं, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.

उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी कराडमध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा घेतला. या मेळाव्यात उदयनराजेंनी जाहीर माफी मागितली.

काय आहे नेमकं प्रकरण?

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची सांगता सभा कराडमध्ये झाली होती. यावेळी भाजप जिल्हाध्यक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मतं देऊ नका, भाजपला द्या, असं आवाहन करताना मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी उदयनराजे भोसले मंचावर उपस्थित नव्हते.

 उदयनराजेंचा माफीनामा

उदयनराजेंनी आज मेळावा घेऊन, तिथे जाहीर माफी मागितली. उदयनराजे म्हणाले, “माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केलं नाही, दुसऱ्याने केलं, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मतितार्थ एवढाच की समाज एकत्र राहायला नको. मोठेपणाने बोलतात.  भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावार विरजण टाकलं. मी त्या सभेत असतो तर सभेतून खाली खेचलं असतं”.

मी फक्त सॉरी म्हणायला आलोय, जे मी केलं नाही, जे कृत्य मी केलं नाही. त्यासाठी सॉरी म्हणायला आलो आहे. माझी तुम्हाला शपथ आहे, असा कोणी करणारा असेल, त्याला खाली खेचा, ठेचा पण माझ्यावरती त्याचं गालबोट नको, असं उदयनराजे म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील लोकांना  माझी गरज असती तर मी घसरगुंडीवरुन खाली गेलो नसतो, असंही उदयनराजे म्हणाले. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांचा नावलौकिक वाढेल असे काम करावे, असंही उदयनराजेंनी नमूद केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *