ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग ते आणीबाणी … उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर समोर
संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या खास मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात लाडकी बहीण योजना, महापालिका निवडणूक, विधानसभा निकाल आणि ठाकरे गटातल्या अंतर्गत राजकारणावर चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत येत्या 19 आणि 20 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात लाडकी बहीण योजना, महापालिका निवडणूक, विधानसभा निकाल, ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग यावर भाष्य करण्यात आले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादतेय किंवा लावते हे उघड तरी केलं होतं, यांच्यात ते करायचीही हिंमत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
खासदार संजय राऊत यांनी नुकतंच ट्वीटरवर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर प्रसिद्ध केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे हे लाडकी बहीण योजना, महापालिकेच्या पैशांवर डल्ला, विधानसभेचे निकाल, वन पार्टी वन इलेक्शन, ठाकरे गटातून सुरु असलेली आऊटगोईंग आणि जातीपातीचे राजकारण यावर भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
संजय राऊत यांनी शेअर केलेला हा प्रोमो २ मिनिटाचा आहे. या व्हिडीओत संजय राऊत उद्धव ठाकरेंना शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत, इथून आदिवासींचे पैसे तिथे वळवा, यांच्या पैसे तिथे वळवा, महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय, असा आरोप मनी केली. यानंतर संजय राऊतांनी राहुल गांधींचा उल्लेख करत विधानसभा निकालवर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने न्हाहून निघायला हवा होता, पण तो अवाक का झाला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ब्रँड ठाकरे! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सूपर फ़ास्ट मुलाखत! सामना १९ आणि २० जुलै! pic.twitter.com/Hj9eSMRHkO
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2025
यानंतर उद्धव ठाकरेंनी जे. पी. नड्डा बोललेत की एकच पक्ष राहणार म्हणजेच वन पार्टी आणि नो इलेक्शन असे त्यांनी म्हटले. यासोबत संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटातून जे आऊटगोईंग सुरु आहे, त्याला उपाय काय असा प्रश्न विचारला. यावेळी उद्धव ठाकरेंनी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादतेय किंवा लावते हे उघड केलं होतं, यांच्या ते करायचीही हिंमत नाही, असा घणाघात सरकारवर केला. लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.
