बिनविरोध निवडणुकांचा निकाल राखून ठेवू नका, निवडणूकच रद्द करा; उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत जाहिरनामा प्रसिद्ध केला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. हेच नाही तर निवडणुका रद्द करा असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुका आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणुका लढत आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येत निवडणुका लढत आहे. शिवसेना भवनात होऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वचननामा जाहीर केला. यादरम्यान भाजपावर जोरदार टीका करताना दोन्ही ठाकरे बंधू दिसले. यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटल की, आम्ही साधी कामे केली होती. होर्डिंगवर दाखवत आहोत. कोस्टल रोडचं काम केलं. मध्य वैतरणा केलंय. मोदींनी कैलास पर्वत तयार केला आहे. मोदींनी गंगेतून पाणी आणलं. मिंध्यांनी अरबी समुद्र बांधला आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कोर्टात जाऊन काय होणार आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर. निवडणूक आयोगावर दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी. आरओ होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज सारखं डीलिट केलं का. बिनविरोध निवडणुका कशा होतात, याबद्दल बोलतानाही उद्धव ठाकरे दिसले. थेट निवडणुका रद्द करा, असे थेट मोठे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केले.
कोरोना काळात एक पुस्तिका तयार केली होती. ती आयोगाने रिजेक्ट केली. आता मी बेधडक वाटप करणार. निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कामं केलं नव्हतं. कोरोनाचं काम स्वत केलं. आमच्या कामाची तारीफ जगाने केली, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेच नाही तर चक्क नरेंद्र मोदीही होते. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अदानीवरही टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. महिलांना कामही देणार आणि त्यांनी दीड हजार रुपयही देणार. मनमोहन सिंग यांनी मुंबईत आर्थिक केंद्र केलं. त्यांचं मुंबईवर प्रेम होतं, सांगताना उद्धव ठाकरे दिसले.
