जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतं… राज ठाकरे यांचे मोठे विधान, थेट संजय राऊत यांना..
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले असून दोन्ही पक्ष मिळून वचननामा जाहीर केला. यादरम्यान राज ठाकरे यांनी मोठे विधान केले. राज ठाकरे 20 वर्षानंतर सेना भवनात दाखल झाले आहेत.

राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनात दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वचनमाना जाहीर केला. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, मी नव्या शिवसेना भवनमध्ये पहिल्यांदाच आलो. माझ्या जुन्या शिवसेना भवनासोबत बऱ्याच आठवणी आहेत. नवीन शिवसेना भवनात कुठे काय आहे, हे मला माहिती नाही. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी संजय राऊतांनी फिरकी घेतली. राज ठाकरे यांनी म्हटले की, माझे मित्र संजय राऊत यांनी वारंवार 20 वर्षानंतर आले असा वारंवार उल्लेख केला. मला वाटतं जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतं. खूप वर्षाने सेनाभवनात आलो. नवीन सेना भवन पहिल्यांदाच बघतो. कायमच्या आठवणी या जुन्या शिवसेना भवनाच्या आहेत.
आता कुठे काय होतंय समजत नाही. आठवत नाही. जुन्या सेनाभवनातील आठवणी या रोमांचकारी आहेत. आनंददायी आणि अशा त्या आठवणींना… तुमच्यासोबत बसलो तर इतक्या गोष्टी सांगता येतील पूर्वी पासूनच्या. 77 साली शिवसेना भवन झालं. तेव्हाच जनता पक्षाचं सरकार आलं होतं. ती सभा झाल्यावर सेना भवनावर दगडफेक झाली होती. तेव्हापासूनच्या आठवणी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
इथे शिवशक्तीचा शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा एक संयुक्त जाहीरनामा प्रकाशित झाला आहे. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी या वचननाम्यातील गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर परत किती चर्चा करायची याचा विचार करावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटले की, आज वेगळं चित्र दिसत आहे. राज ठाकरे 20 वर्षानंतर सेनाभवनात एकत्र आले आहेत.
हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली असं आहे. संयुक्त सभा, संयुक्त पत्रकार परिषदा, संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा. सर्व काही संयुक्त होत आहे. आज शिवशक्ती एकत्र आली आहे. सेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा संयुक्त वचननामा प्रकाशित होत आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या सभागृहात दोन दिवसांपूर्वी वचननाम्यावर चर्चा करून माहिती दिली आहे. आज अधिकृत प्रकाशन होणार आहे. हे निमित्त आहे, असे राऊतांनी म्हटले.
