AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, चंद्रपूरात हृदय पिटाळून टाकणारी घटना

सध्या खरीप हंगाम तोंडावर असून शेत शिवारामध्ये शेती मशागतीची कामे सुरु आहेत. पावसाला सुरवात होण्यापूर्वी कामे आटोपून घेण्यासाठी रामभाऊ मरापे हे शेतावर जात होते. मंगळारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे शेताकडे गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची बाब समोर येत आहे. यामध्ये मरापे हे गंभीर जखमी झाले अन् यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करुन पंचनामा करण्यास सुरवात केली होती.

Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, चंद्रपूरात हृदय पिटाळून टाकणारी घटना
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 2:15 PM
Share

चंद्रपूर : शेतीकामे (Farm Work) करीत असताना अचानक (Tiger) वाघाने चढवलेल्या हल्ल्यात (Farmer Death) शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मूल तालुक्यातील करवन शेतशिवारात ही दुर्घटना घडली असून रामभाऊ मरापे (42) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर असून शेती मशागतीची कामे सुरु आहेत. करवन शिवारात मरापे यांची शेत जमिन आहे. रामभाऊ हे नेहमीप्रमाणे शेती काम करण्यासाठी मंगळवारी सकाळीच शेतावर गेले होते. दरम्यान, वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शेतीकाम करीत असताना घडली घटना

सध्या खरीप हंगाम तोंडावर असून शेत शिवारामध्ये शेती मशागतीची कामे सुरु आहेत. पावसाला सुरवात होण्यापूर्वी कामे आटोपून घेण्यासाठी रामभाऊ मरापे हे शेतावर जात होते. मंगळारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे शेताकडे गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची बाब समोर येत आहे. यामध्ये मरापे हे गंभीर जखमी झाले अन् यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करुन पंचनामा करण्यात आला आहेत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्राणी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

आठवड्याभरापूर्वीच पती-पत्नीचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती हा बेपत्ता झाला होता. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील केवडा शिवारात ही घटना घडली होती.सध्या तेंदूपत्याची पाने तोडण्याचे काम सुरु असल्याने नागरिकांना जंगलात जावे लागते. दरम्यान अशा घटना वाढू लागल्या आहेत.

नागरिकांमध्ये दहशत

वन्यप्राण्यांकडून दिवसाही हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय यामधून नागरिकांची सुटकाच होत नाही. जखमी कमी आणि मृत्यू अधिक अशाच घटना घडल्या आहेत. 21 मे रोजी तर शहराजवळच असलेल्या सिन्हाळा येथे ग्रामस्थावर वाघाने हल्ला चढविला होता.बकऱ्या चारण्यासाठी गावाला लागून असलेल्या शेतावर दशरथ पेंदोरे हे गेले असता ही दुर्घटना घडली होती. त्यामुळे नारगिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.