VIDEO : ‘शिवडे आय लव्ह यु’नंतर कोल्हापुरातील रस्त्यावर I Love You !

प्रियकराने थेट डांबरी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या ऑईलपेंटने I love you आणि I miss you असं लिहिलं आहे (Unknown person wrote I love you on road in Kolhapur).

VIDEO : 'शिवडे आय लव्ह यु'नंतर कोल्हापुरातील रस्त्यावर I Love You !
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:55 PM

कोल्हापूर : पुण्यातील एका प्रियकराची पोस्टरबाजी चांगलीच रंगली होती. या प्रियकराने त्याच्या शिवडे नावाच्या प्रेयसीचं नाव घेत आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. तेव्हा पुण्यात ठिकठिकाणी तशाप्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यानंतरही तशाचप्रकारचे आणखी काही फ्लेक्स पुण्यातील नागरिकांना दिसते होते. पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरात एका प्रियकराने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. या प्रियकराने थेट डांबरी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या ऑईलपेंटने I love you आणि I miss you असं लिहिलं आहे (Unknown person wrote I love you on road in Kolhapur).

अडीच किमी रस्त्यावर ‘आय लव यु’

प्रेमात कोणीही काहीही करू शकतं आणि कोणत्याही स्थरावर जाऊ शकतो. याची उदाहरणे आपण अनेकदा बघितली आहेत. असाच एक वेगळा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे एका प्रियकराने केला आहे. प्रियकराने ‘क्यूकी’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे धरणगुत्ती-जयसिंगपूर मार्गावर तब्बल अडीच किमी रस्त्यावर ‘आय लव यू’ आणि ‘आय मिस यु’ असे लिखान ऑईलपेंटने केलं आहे. याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र हे कधी लिहले आणि कोणासाठी लिहले याचा मात्र, थांगपत्ता लागला नाही (Unknown person wrote I love you on road in Kolhapur).

कुणालाच थांगपत्ता नाही

प्रेमामुळे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पहायला मिळतात. नुकतंच काही महिन्यांपूर्वी उस्मानाबाद येथील एक युवक आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघाला होता. त्याला कच्छ बॉर्डरवर पोलिसांनी ताब्यात घेवून पुन्हा घरी सोडले होते. शिवाय याच प्रेमामुळे अनेक घटनाही घडत असतात. अशी वेगवेगळी प्रकरणे ताजी असताना शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावात प्रेमाचा अगळावेगळा प्रकार पहायला मिळाला आहे. चक्क प्रियसीसाठी एकाने अडीच किमी डांबरी रस्त्यावर पांढर्‍या ऑईल पेंटने पाच फुट अंतरावर ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ असं लिहीले आहे. मात्र हा जो कोण प्रियकर आहे. त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात हा रस्ता कधी रंगवला? याचा कुणाला थांगपत्ता लागलेला नाही.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जयसिंगपूर धरणगुत्ती हा 6 ते 7 किमीचा रस्ता आहे. गावाच्या तीन किमी अलिकडे ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ लिखानाची सुरूवात झाली आहे. तर गाव संपन्याच्या अर्धा किमी आधी हे लिखान थांबवलेलं आहे. ज्या ठिकाणी रस्त्यावर दोन ते तीन बाह्यवळणे आहेत तिथून प्रवास करताना रस्त्यावर लिहिलेले शब्दे पाहून सर्वच नागरिक अचंबित होत आहेत. अनेकजण याचा फोटो काढून सोशल मिडीयावर टाकत आहे. शिवाय कोण आहे हा प्रियकर याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार, मोदी सरकारचे मोठे संकेत

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.