सांगली : राज्यातील विविध बाजारात टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्यानं लाल चिखल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून, राज्यातील भाजीपाला आणि फळांच्या कोसळलेल्या दरा बाबत राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडणार असल्याची माहिती कृषी व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. तसंच राज्यात विदर्भ, मराठवाडा भागात अतिवृष्टी होऊन झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीच्या बाबतही निर्णय घेण्यात येईल, असंही कदम यांनी स्पष्ट केलंय. (Meeting for strategic decision on vegetable and fruit prices -Vishwajit kadam)