Video| मंदिरासमोरील झाडावर नागाने ठोकला तीन दिवस मुक्काम, तर्क-वितर्कांना उधाण; तुगाव हालसीमधील घटना

भालकी तालुक्यातल्या तुगाव-हालसी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका मदिंरासमोर असलेल्या झाडावर नाग प्रजातीच्या सापाने तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. या घटनेचे गावकऱ्यांमधून देखील अश्चर्य व्यक्त होत आहे

Video| मंदिरासमोरील झाडावर नागाने ठोकला तीन दिवस मुक्काम, तर्क-वितर्कांना उधाण; तुगाव हालसीमधील घटना
झाडावर साप

लातूर : भालकी तालुक्यातल्या तुगाव-हालसी (Tugav Halsi) गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका मदिंरासमोर असलेल्या झाडावर नाग प्रजातीच्या सापाने (snake on a tree) तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. या घटनेचे गावकऱ्यांमधून देखील अश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान काही केल्या हा नाग या झाडावरून हालत नसल्याने गावकऱ्यांकडून या नागारीच पूजा करण्यात आली. या नागाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर एकाच झाडावर तीन दिवस राहिल्यानंतर हा नाग तिसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी निघून गेला. दरम्यान हा नाग इथे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांकडून सर्पमित्रांना देखील बोलावण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार सर्पमित्रांनी या सापाला दूर सोडल्यानंतर देखील हा साप पुन्हा त्याच झाडावर आला.

बघ्यांची गर्दी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकच्या भालकी तालुक्यातील तुगाव -हालसीमध्ये गावाच्या बाहेर एक लक्ष्मीचं मंदिर आहे. या मंदिराबाहेर असलेल्या एका झाडावर गेल्या तीन दिवसांपासून एक नाग एकाच ठिकाणी ठाण मांडून बसला होता. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली, त्यानंतर या नागाला पहाण्यासाठी स्थानिकांसोबतच आसपासच्या गावातील लोकांनी देखील गर्दी केली होती. गर्दी वाढल्यानंतर देखील हा नाग एकाच ठिकाणी बसून होता. अखेर ग्रामस्थांच्या वतीने घटनेची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्रांच्या मदतीने या नागाला गावाबाहेर सोडण्यात आले. मात्र पुन्हा हा नाग याच झाडावर येऊन बसल्याचा दावा ग्रामस्तांनी केला.

वाजत गाजत देवीला नैवेद्य

दरम्यान सापाने या झाडावर सलग तीन दिवस ठाण मांडल्याने गावात तर्क वितर्कांना उधाण आल्याचे पहायला मिळाले. याच झाडासमोर देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावाने दरवर्षी भव्य अशी जत्रा भरते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून यात्राच न भरल्याने हा नाग काही तरी सूचवायला आला असेल अशी भावना देवीच्या भक्तांनी व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने वाजत-गाजत मोठ्या भक्तीभावाने देवीला नवैद्य दाखवण्यात आला. मात्र तीन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर अखेर सो्मवारी सायंकाळी हा नाग निघून गेला.

संबंधित बातम्या

अमगावतीच्या ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचणार, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

Goa Assembly Election 2022 : ‘गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत, डिपॉझिट वाचवण्यासाठी’, देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

Pune Corona | पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर बंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Published On - 8:11 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI