Vijay Wadettiwar: गेल्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं? मुख्यमंत्री दुष्काळ दौऱ्यावर असतानाच विजय वडेट्टीवार यांनी घेरलं
Vijay Waddettiwar on Devendra Fadnavis: मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं? असा थेट सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. मुख्यमंत्री दु्ष्काळ दौऱ्यावर असतानाच काँग्रेसने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

Vijay Waddettiwar on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला भेट देत आहेत. दुष्काळाची भीषणता, दाहकता त्यांनी पाहिली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी या दौऱ्यात जाहीर केले. त्याचवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पॅकेजवरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं? असा थेट सवाल त्यांनी फडणवीस यांना विचारला. ओला दुष्काळाचे पैसे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत उर्वरीत शेतकऱ्यांना अद्याप लाभ न मिळाल्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
विजय वडेट्टीवार यांचा रोखठोक सवाल
7 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेजची घोषणा केली होती. 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यातील 68.69 लाख हेक्टर जमीन बाधित झाली होती. मोठं नुकसान झालं होते. शेतकर्यांच्या हातातून पिकं गेलं होतं. 31,628 कोटींच्या पॅकेजमधून सरकारने केवळ 99 लाख रुपये दिले. गेल्या पॅकेजमध्ये सरकारने केवळ 15,661 कोटी रुपये खर्च झाला. म्हणजे इतकी मोठी घोषणा करून निम्मेच पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडले. म्हणजे तुम्ही पॅकेजची घोषणा करणार, पण ते शेतकऱ्यांच्या खात्यात, हातात गेले पाहिजेत ना, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
किमान 50 हजारांची मदत द्या
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ पाहणी दौरा करणार, फिरून येणार. पण शेतकऱ्यांना तुम्ही काय देणार आहात. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. ते पुसण्याचे काम सरकारने केले पाहिजे. 50 हजारांची किमान मदत केली पाहिजे. रोजगार हमीची कामं सुरू केली पाहिजेत. सर्व प्रकारचं कर्ज कर्ज माफ व्हावं. पीक कर्ज असेल वा इतर कर्ज माफ करा. शेतात काही पिकणारच नसेल तर शेतकरी कुठून भरपाई करणार. तातडीने पंचनामे करा. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेऊन मदत पैकेजची घोषणा करा विजय वडेट्टीवार यांची मागणी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करावं. दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणाही पोकळ निघाली. कोणताही शेतकरी कर्जातून मुक्त झाला नाही. शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. त्याचा सातबारा अजून कोरा झाला नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
वाढवण बंदर प्रकल्पावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या प्रकल्पासाठी सरकारने साडेतेवीस हजार कोटींची निविदा काढली. हे बंदर सरकारने अदाणीला दिला. म्हणजे मालकी अदाणींची आणि सरकारच्या तिजोरीतून त्यासाठी पैसा दिला जाणार असा आरोप त्यांनी केला. हे पैसे शेतकऱ्यांना द्या. शक्तिपीठ महामार्गाची काय गरज आहे. हा पैसा शेतकऱ्यांकडे वळला तर दुष्काळावर मात करता येईल असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
