मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नाशिकच्या डॉक्टर आणि सलून चालकाची अनोखी ऑफर

राज्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तसेच, नागरिकांमध्ये मतदानाची जागरुकता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.

मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नाशिकच्या डॉक्टर आणि सलून चालकाची अनोखी ऑफर

नाशिक : राज्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तसेच, नागरिकांमध्ये मतदानाची जागरुकता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. मात्र, नाशिकचे सलून चालक प्रभाकर सैनदाने आणि डॉक्टर सचिन देवरे यांनी नागरिकांमध्ये मतदानासाठी जागरुकता पसरवण्यासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. ‘मतदान करा आणि दाढी, कटिंगवर 50 टक्के सूट (vote up and get a discount) मिळवा’ आणि डॉ. सचिन देवरे यांनी ‘मतदान करा आणि आमच्या क्लिनिकमधून मोफत तपासणी करुन घ्या’, अशी ऑफर मतदारांना दिली आहे. नाशिकमध्ये सध्या या ऑफरची ( vote up and get a discount) चर्चा सुरु आहे.

प्रभाकर सैनदाने हे गेल्या अनेक वर्षांपासून सलून चालवत आहेत. सैनदाने हे लोकसेवेचं काम करत असतात. उत्सव कोणताही असो हे सलून चालक नेहमीच त्यांच्या सलूनमध्ये अशा निरनिराळ्या प्रकारच्या ऑफर ठेवत असतात. उत्पन्न अगदी मोजकच, मात्र आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी म्हणून हे नेहमी प्रयत्नशील असतात. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मतदारांना अनोखी ऑफर देऊन मतदान करण्याच आवाहन केलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीतही त्यांनी ऑफर देऊन मतदान करण्याचं आव्हान केलं. त्यांनी ‘मतदान करा आणि दाढी, कटिंगवर 50 टक्के सूट मिळवा’ अशी ऑफर त्यांच्या सलूनमध्ये ठेवली आहे.

लोकशाहीत मतदानाला फार महत्त्व आहे, मात्र तेच नागरिक टाळतात. त्यामुळे आपल्या हातून लोकशाही बळकट करण्यास मदत व्हावी म्हणून डॉ. सचिन देवरे यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मतदानाचं आवाहन केलं आहे. जे नागरिक मतदान करतील आणि बोटाची शाही दाखवतील त्या मतदारांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल अशी ऑफर डॉय सचिन देवरे यांनी ठेवली आहे.

नागरिकांनी मतदान करावं यासाठी या मंडळींनी आपलं नुकसान करुन मतदारांसाटी या ऑफर ठेवल्या आहेत. मतदान करणं देशाच्या नागरिकांचं कर्तव्य आहे आणि आपण ते केलंच पाहिजे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी नागरिकांनी मत देणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता प्रत्यकाने मतदान करावं, असं आवाहन प्रभाकर सैनदाने आणि डॉ. सचिन देवरे यांनी केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *