आम्ही 220 जागा नक्की जिंकू, चंद्रकांत पाटलांना विश्वास

भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly election dates 2019) सज्ज आहे. या निवडणुकीत (Maharashtra Assembly election dates 2019) महायुती किमान 220 जागा जिंकून विजयी होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.

आम्ही 220 जागा नक्की जिंकू, चंद्रकांत पाटलांना विश्वास
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 3:45 PM

मुंबई : भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly election dates 2019) सज्ज आहे. या निवडणुकीत (Maharashtra Assembly election dates 2019) महायुती किमान 220 जागा जिंकून विजयी होईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे महायुतीला 220 पेक्षाही जास्त जागा मिळू शकतात, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले काम आम्ही जनतेसमोर मांडू. गेल्या पाच वर्षांत विविध निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्याने यश मिळालेले आहे. भाजपा महायुती सरकारचे काम आणि गेल्या पाच वर्षांतील संघटनात्मक तयारी यामुळे आगामी निवडणुकीत नक्की यश मिळेल”.

भाजपा शिवेसना युतीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याl चर्चा चालू आहे. युतीची घोषणा लवकरच होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
  • नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
  • अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
  • मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
  • मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.