Wine | सरकार म्हणतं वाईन दारू नाही, मग वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार ? मुंबई पोलीस म्हणाले…

वाईन आणि दारु याच्यात नेमका फरक काय आहे. असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच सरकारने वाईन विकायची परवानगी दिली असेल तर वाईन पिऊन गाडी चालवल्यास सरकारला दंड घेण्याचा अधिकार असेल का ? असा सवाल विचारला जात आहे.

Wine | सरकार म्हणतं वाईन दारू नाही, मग वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार ? मुंबई पोलीस म्हणाले...
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर सरकारला प्रश्न विचारला आहे.
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:00 AM

मुंबई : राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन (wine) विक्रीला परवानगी दिली आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. या निर्णयानंतर आता राज्य सरकारवर सडकून टीका केली जातेय. भाजपने (BJP) तर हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा दावा सत्ताधारी करत आहेत. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर वाईन आणि दारु याच्यात नेमका फरक काय आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच सरकारने वाईन विकायची परवानगी दिली असेल तर वाईन पिऊन गाडी चालवल्यास सरकारला दंड घेण्याचा अधिकार असेल का ? असा सवाल केला जात आहे.

वाईन पिऊन गाडी चालवल्यावर दंड होणार ? 

वाईन विक्रीस परवानगी दिल्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जातेय. दिग्दर्शक केदार शिंदेय यांनी तर सोशल मीडियावर सकारला थेट प्रश्न विचारला आहे. ‘वाईन आणि दारु यात फरक आहे, असं सरकार म्हणतं. मग लोकांनी वाईन पिऊन गाडी चालवल्यावर त्यांच्याकडून दंड घेण्याचा अधिकार सरकारला आहे का ?’ असं केदार शिंदे यांनी विचारलंय. तर दुसरीकडे शिवम वहिया यांनी मुंबई पोलिसांना उद्देशून मजेशीर पद्धतीने अशाच आशयाचा प्रश्न केलाय.

मी वाईन पिऊन वाहन चालवले तर मुंबई पोलीस मला तुरुंगात टाकतील की जवळचा बार दाखवतील असं शिवम यांनी मिश्कीलपणे विचारलंय. या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीदेखील तेवढ्याच चपखल पद्धतीने उत्तर दिले आहे. जर तुमची चाचणी केल्यानंतर तुमच्या शरीरात अल्कोहोल आढळले तर आम्ही तुमच्यावर निश्चित कारवाई करु. तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

Corona | आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

Breaking News | पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Pimpri Chinchwad Crime|विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली 18 महिन्यांची शिक्षा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.