माहेरी जाऊ नि दिल्याने दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

माहेरी जाऊ न दिल्याने एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या (buldana women suicide with children) केली.

माहेरी जाऊ नि दिल्याने दोन चिमुकल्यांसह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

बुलडाणा : माहेरी जाऊ न दिल्याने एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या (buldana women suicide with children) केली. ही धक्कादायक घटना बुलडाणा येथील चिखली, मंगरुळ येथे काल (31 ऑक्टोबर) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (buldana women suicide with children) उडाली आहे. ओमकार बोर्डे (8), छकुली बोर्डे (6) आणि वैशाली बोर्डे अशी मृतांची नावं आहेत.

दिवाळीचा सण सुरु असल्याने मुलांच्याही शाळेला सुट्ट्या होत्या. त्यामुळे तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पण पती माहेरी जाऊ देत नसल्याने पती-पत्नीत जोराचा वाद झाला. त्यामुळे रागात वैशालीने आपल्या दोन मुलांसह शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली, असं ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेरकाढून जवळच्या रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अद्याप कुणावर गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान, मुलांसह पत्तीने आत्महत्या केल्याने वैशालीचा पती आणि त्याच्या कुटुंबावर दुखा:चा डोगंर कोसळला आहे. या घटनेमुळे गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *