AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Pole | वणीच्या सिमेंट रोडवरील इलेक्ट्रिक पोल जीवघेणे, शिष्टमंडळ संतप्त, काय केली मागणी?

यवतमाळ जिल्ह्यातील वणी-यवतमाळ मार्गावर इलेट्रिक पोल आहेत. रस्त्याचे काम झाले पण, हे पोल रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. दोन सरकारी कार्यालये पोलची जबाबदारी एकदुसऱ्यावर ढकलताना दिसतात. त्यामुळं वणीकर संतप्त झाले आहेत.

Electric Pole | वणीच्या सिमेंट रोडवरील इलेक्ट्रिक पोल जीवघेणे, शिष्टमंडळ संतप्त, काय केली मागणी?
अधिकाऱ्यांना व्यथा सांगताना टीकाराम कोंगरे
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 8:18 AM
Share

यवतमाळ : वणीमध्ये दोन शासकीय कार्यालयाच्या भानगडीत अपघाताच्या प्रमाणात वाढ झालीय. वणीतील नवीन सिमेंट रोडवरील इलेक्ट्रिक पोल (Electric Pole) नागरिकांचा जीव घेत आहेत. अधीक्षक अभियंत्यास (Superintending Engineer) प्रतिकात्मक लोखंडी इलेक्ट्रिक पोल भेट देण्यात आले. अपघातास आम्ही जबाबदार नाही असं उत्तर दिल्याने वणीकर शिष्टमंडळ संतप्त झाले. वणी येथील साई मंदिर ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहेत. मात्र मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रिक पोलमुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले. या अपघाताची जबाबदारी ही एमएसईबी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे. प्रत्येक कार्यालय एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. यात नागरिकांचा जीव मात्र जात आहे. येत्या चार-पाच दिवसांत रस्त्यावरील पोल हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे (Tikaram Congre) यांनी दिला आहे.

यमदुतासारखे रस्त्याच्या मधोमध पोल

पोल रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात आहे. या निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक लोखंडी इलेक्ट्रिक पोल अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना भेट दिला. त्यामुळे खडाजंगी झाली. अपघातास आम्ही जबाबदार नाही असं उत्तर दिल्याने वणीकर शिष्टमंडळ संतप्त झाले. वणीवरुन यवतमाळ जाण्याकरिता वणी शहरातील नवीन सिमेंट रोड तयार करण्यात आलेला आहे. या रोड चे साधारणत: सहा महिन्यांपूर्वी काम झालेले आहे. परंतु सदर रोडच्या मध्यभागी वीज वितरण कंपनीचे चालू स्थितीतील लोखंडी पोल आहेत. ते पोल मध्यभागी असून या पोलवर कोणतीही सुरक्षितता नाही.

प्रा. टीकाराम कोंगरे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

रोडवर वाहतूक करणाऱ्या जनतेस याचा त्रास होत आहे. पोलमुळे आजपर्यंत सात ते आठ अपघात झालेले आहे. यापुढे सुद्धा मोठे अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोडवरील पोल इतस्त्र स्थानांतरित करण्याबाबत स्थानिक कार्यालयास संपर्क करण्यात आला. पण, अद्यापपावेतो कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तरी आपण आपल्या स्तरावरुन तात्काळ हे पोल इतरत्र स्थानांतरित करण्याची व्यवस्था करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांनी दिला.

Nagpur Crime : नागपूरमधील अॅसिड हल्ल्याची रुपाली चाकणकरांकडून दखल, पतीनेच केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur School : 26 जानेवारीपर्यंत नागपुरातील शाळा बंदच, पालकमंत्र्यांचे आदेश काय? वाचा सविस्तर

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.