जय भवानी, जय सेवालाल अशा घोषणांनी भाषणाला सुरुवात, मोदींकडून बंजारा भाषेतून यवतमाळच्या जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आले. त्यांनी जय भवानी, जय सेवालाल, जय बिरसा अशा घोषणांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी यवतमाळच्या जनतेशी बंजारा भाषेतूनही संवाद साधत नमस्कार केला.

जय भवानी, जय सेवालाल अशा घोषणांनी भाषणाला सुरुवात, मोदींकडून बंजारा भाषेतून यवतमाळच्या जनतेशी संवाद
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 9:39 PM

यवतमाळ | 28 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आले. त्यांनी जय भवानी, जय सेवालाल, जय बिरसा अशा घोषणांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी यवतमाळच्या जनतेशी बंजारा भाषेतूनही संवाद साधत नमस्कार केला. “आपल्या सर्वांना माझा नमस्कार. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंचावर विराजमान सर्व दिग्गजांना, तसेच कार्यक्रमाला देशभरातील शेतकरी जोडले गेले आहेत. मी त्यांना सर्वांचे आभार मानतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीला श्रद्धेने नमन करतो. महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाची शान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी वंदन करतो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मी दहा वर्षांपूर्वी चहावर चर्चा करण्यासाठी यवतमाळला आलो होतो तेव्हा आपण खूप आशीर्वाद दिला. देशाच्या जनतेने एनडीएला 300 पार पोहोचवलं. त्यानंतर मी 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ आलो होतो. तेव्हाही तुम्ही खूप प्रेम दिलं. तेव्हा एनडीएला 300 पार करुन दिलं. आज 2024 च्या निवडणुकीआधी मी विकासाच्या उत्सवात सहभागी व्हायला आलोय तर देशात एकच आवाज गुंजत आहे, अबकी बार मोदी सरकार. मी समोर पाहतोय, किती मोठ्या प्रमाणात माता, बघिणी मला आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. मी गावखेड्यांमधून आलेल्या या मातांना नमस्कार करतो.

‘दहा वर्षात जे काही केलं त्याचा येणाऱ्या 25 वर्षांत फायदा होईल’

“यवतमाळ, वाशिंद, चंद्रपूरसह पूर्ण विदर्भाचा आशीर्वाद मिळतोय. त्यांनी निश्चित केलंय की एनडी सरकार 400 पार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे लोक आहोत. त्यांच्या शसनाला 350 वर्षे झाले आहेत. त्यांचा राज्यभिषेक झाला तेव्हा ते सुद्धा सत्ता उपभोगू शकले असते. पण त्यांनी सत्तेसाठी नाही तर राष्ट्राच्या चेतना आणि शक्तीला सर्वोच्च ठेवलं. जोपर्यंत राहिले तोपर्यंत राष्ट्रासाठी काम केलं. आम्हीसुद्धा देश बनवण्यासाठी नागरिकांचं जीवन बदलण्यासाठी एक मिशन घेऊन निघालेले लोक आहोत. त्यामुळे गेल्या दहा वर्षात जे काही केलं त्याचा येणाऱ्या 25 वर्षांत फायदा होईल”, असा दावा मोदींनी केला.

“मी भारताच्या विकासासाठी संकल्प केलाय. या संकल्पासाठी मी जीवानाचा प्रत्यक क्षण आपल्यासाठी समर्पित आहे. भारताला विकसित बनवण्यासाठी चार सर्वात मोठी प्राथमिकता आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि नारी शक्ते हे चारही सशक्त झाले तर प्रत्येक समाज, प्रत्येक परिवार सशक्त होईल. आज इथे यवतमाळमध्ये याच गरीब, शेतकरी, तरुण, महिला सर्वांना सशक्त करण्याचं काम झालंय”, असं मोदी म्हणाले.

‘हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण’

“महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित हजारो कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण झालंय. आज शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळतेय. गरिबांना पक्के घरं मिळत आहे. गावच्या गरिब स्त्रियांना आर्थिक मदत मिळत आहे. तसेच तरुणांना भविष्य बनवणारं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत आहे. रेल्वे प्रोजेक्ट, नव्या रेल्वे गाड्या आज सुरु झाल्या आहेत. या सर्वांसाठी मी आपले आभार मानतो”, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या.

“काही दिवसांपूर्वी आमच्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकरी आणि मजुरांना फायदा होईल. धान्याचे गोदाम उभारण्याची योजना सुरु झाली आहे. हे गोदाम आमच्या शेतकऱ्यांची, सहकारी समित्या, सरकारी संघटन बनवतील आणि नियंत्रित करतील. यातून लहान शेतकऱ्यांना विशेष लाभ होईल. त्यांना मजबुरीने कमी किंमतीत आपले पिकं विकावे लागणार नाहीत”, असं मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.