AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse: होय, मी भाजपला मदत केली, नाथाभाऊंच्या वक्तव्यानं राजकीय भूकंप; म्हणाले, मी पुढेही त्रास …

Eknath Khadse on Gulabrao Patil: जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच ढवळून निघालं आहे. गुलाबराव पाटील त्यांच्या राजकीय वक्तव्याने सातत्याने चर्चेत आहेत. तर एकनाथ खडसे यांनी सुद्धा मैदान गाजवले आहे. आता तर त्यांनी मोठी कबुली देत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. नाथाभाऊंच्या वक्तव्यानं स्थानिक राजकीय गणितं वेगळी असतात हे पुन्हा अधोरेखित केलं आहे.

Eknath Khadse: होय, मी भाजपला मदत केली, नाथाभाऊंच्या वक्तव्यानं राजकीय भूकंप; म्हणाले, मी पुढेही त्रास ...
गुलाबराव पाटील, एकनाथ खडसेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 25, 2026 | 2:00 PM
Share

Eknath Khadse on Gulabrao Patil: जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही हे जगजाहीर आहे. पण शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना अधुनमधून राजकीय फिरकी घेण्याचा मोह आवरत नाही. जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील राजकारणावर गुलाबरावांची बारीक नजर असते. कोणत्या मुद्याची री कुठं ओढायची यांचं राजकीय टायमिंग त्यांच्या इतकं कुणीच साधत नाही. आता कालच्या एकाच कार्यक्रमातून त्यांनी धडाधड अनेक विषयांना हात घातला आणि बोलून मोकळे झाले. त्यानिमित्त चर्चेत राहण्याचं कसब गुलाबरावांइतकं खचितंच राज्यातील इतर नेत्यांकडं असेल. काल त्यांनी नाथाभाऊंना चिमटा काढला आणि आज खडसे यांनी ब्रेकिंग देऊन टाकली.

यापुढेही त्रास देणार

एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले. मला एकनाथ खडसे यांनी खूप त्रास दिला. त्यामुळे त्यांना त्या कर्माची फळं इथंच भोगावी लागत असल्याचा दावा पाटलांनी एका सभेत केला होता. त्यावर नाथाभाऊंनी खणखणीत प्रतिक्रिया दिली.अहो गुलाबराव पाटील मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला ही बाब खरी आहे मात्र भ्रष्ट गुंड लोकांना दिला. गुलाबराव मी भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक यांना मोठ्या प्रमाणात जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, असे एकनाथ खडसे म्हणाले. मी त्रास दिला ही गोष्ट खरी आहे जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही गुंड आणि भ्रष्टाचार करणार्‍यांना मी त्रास दिला आणि पुढेही त्रास देईल, असा सूचक इशारा एकनाथ खडसेंनी दिला. गुलाबराव पाटील हे विसरले असतील मी त्यांना आमदारकीतही मोठी मदत प्रचारादरम्यान केली. गुलाबराव पाटील हे खूप लहान आहेत, असा टोलाही नाथाभाऊंनी हाणला.

होय, मी भाजपचा प्रचार केला

काल एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाचा आढावा घेताना हळूच नाथाभाऊंना चिमटा काढला. मुक्ताईनगर नगरपालिकेत खरा सामना शिवसेना आणि भाजपमध्ये झाल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे नेते नाथाभाऊंनी भाजपचा प्रचार केल्याचा आरोप केला. त्यावर नाथाभाऊ व्यक्त झाले. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपाला मदत केली. गुलाबराव पाटील एवढे वर्ष मंत्री असूनही त्यांच्या गावच्या नगरपरिषदेत त्यांचा पक्ष निवडून आणू शकले नाही. त्यांनी आत्मचिंतन कराव असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. तर खरं बोलायला काय हरकत आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायतच्या निवडणुकीत मी भाजपला मदत केली. होय, मी भाजपला मदत केली, असे प्रत्युत्तर नाथाभाऊंनी दिले.

राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत

दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वरणगावातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ खडसेंना मोठा धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटांमध्ये पक्ष प्रवेश केला. वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी हे पराभूत झाले होते. त्यांना शिंदे गटाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदी घेण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे वरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांसह आज राजेंद्र चौधरी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेमध्ये शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.

भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.