धक्कादायक! भरचौकात तरुणींना मारहाण; तीन जणांना अटक
भुसावळमधील साकेगावमध्ये दोन तरुणींना भरचौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारहाण करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी या तरुणींना मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भुसावळ: तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळमधील साकेगावमध्ये दोन तरुणींना भरचौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारहाण करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी या तरुणींना मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
छेडछाडीच्या घटनेतून मारहाण झाल्याचा संशय
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित तरुणी वैद्यकीय शिक्षणासाठी साकेगावमध्ये राहातात. अल्पवयीन आरोपीने यातील एका तरुणीची छेड काढली होती. यातून तरुणीचा या मुलासोबत वाद झाला. वादनानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी संबंधित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून मारहाण केली. तब्बल दोन ते तीन तास हा गोंधळ सुरू होता. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
तीन जणांना अटक
पीडित तरुणी या घटनेत जखमी झाल्या आहेत. त्या वैद्यकीय शिक्षणासाठी साकेगावमध्ये राहात होत्या. याचदरम्यान छेडछाडीच्या प्रकारावरून संबंधित तरुणींचा आणि मुलाचा वाद झाला होता. या वादानंतर संशयित आरोपीच्या कुटुंबीयांनी या तरुणींना ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणत, भरचैकात मारहाण केली. या प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या
VIDEO: भाजपने विधान परिषदेची संधी पुन्हा डावलली; पंकजा मुंडे म्हणाल्या…
