एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, तरुणाचं राज्यपालांना पत्र, बीड ते लालबागचा राजा पायी दंडवत

मराठवाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा असं या तरुणाने पत्रात म्हटलं आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.

One day CM, एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, तरुणाचं राज्यपालांना पत्र, बीड ते लालबागचा राजा पायी दंडवत

बीड : मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा (One day CM), असं पत्र एका सुशिक्षित तरुणाने थेट राज्यपालांना लिहिलं आहे. मराठवाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा (One day CM) असं या तरुणाने पत्रात म्हटलं आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रामुळे हा तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या पठ्ठ्याने त्याच्या मूळ गावापासून ते लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्रादेखील काढली. एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हटलं की सर्वांना अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतो.

याच चित्रपटातील भूमिका साकारलेल्या अनिल कपूरसारखी एका दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बीड जिल्ह्यातील देवगाव दहिफळ इथला रहिवासी असलेल्या श्रीकांत गदळे या तरुणाने व्यक्त केली आहे. यासाठी त्याने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्र्याची बनण्याची इच्छा व्यक्त केली. केवळ राज्यपालांना पत्र लिहू्न तो थांबलेला नाही. तर ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्याने देवगाव दहिफळ या गावातून थेट लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पद यात्रा देखील केली.

मराठवाड्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मला एका दिवसाचा मुख्यमंत्री करा, अशी इच्छा त्याने बोलून दाखवली आहे. त्याने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे हा तरुण चांगलाच चर्चेत आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *