निवडणूक हारताच अजितदादांचा भाजपाला सर्वात मोठा झटका, थेट बडा नेता फोडला…राज्यात एकच खळबळ!
ZP Election : पुण्यात अजित पवारांनी भाजपाला मोठा दणका दिला आहे. एका बड्या नेत्याने भाजपाची साथ सोडत घड्याळ हाती घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आधी नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. अजित पवारांना महानगर पालिकांच्या निवडणुकीत फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे आता त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. अशातच आता पुण्यात अजित पवारांनी भाजपाला मोठा दणका दिला आहे. एका बड्या नेत्याने भाजपाची साथ सोडत घड्याळ हाती घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यात भाजपला मोठा धक्का
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खेड तालुक्यात अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. शरद बुट्टे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. बुट्टे यांनी गेल्या आठवड्यात अजित पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर कालही एकदा ते भेटले होते. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. याचा परिणाम थेट आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर होणार आहे.
काय म्हणाले शरद बुट्टे ?
राष्ट्रवादीत प्रवेश करताना शरद बुट्टे पाटील यांनी म्हटले की, ‘काल अचानक अजित दादांनी वेळ दिली हा कार्यक्रम मी माझ्या गावात ठेवला. वराळे गाव हे मतदार संघातील सर्वात लहान गाव आहे. 1972 साळी पवार पवार साहेब या गावात आले होते. मला 26 व्या वर्षात अजित पवार यांनी मला जिल्हा परिषद मध्ये सभापती पद दिले होते. त्यावेळी सर्वात कमी वयाचा सभापती बनविण्याचे काम अजित पवार यांनी केले. मलाही काही पदाची अपेक्षा होती. मला पदवीधर संघात अजित दादांनी काम सुरू करायला लावले होते. मी मोठ्या संख्येने नावनोंदणी केली होती. मात्र मला त्यावेळी उमेदवारी मिळाली नाही.’
शरद बुट्टे पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मी भाजप मध्ये प्रवेश केला. या भामा खोऱ्यात विकास करण्याचे काम केले. मी 12 वर्षे भाजपमध्ये काम केले. चांगल्या कामाला विरोध केला नाही. मी वैयक्तिक कोणते काम घेवून कोणाकडे जात नाही जे जातो समाजाचे काम घेऊन जातो. भारतीय जनता पक्षात देखील मला बापट साहेब असतील चंद्रकांतदादा असतील किंवा बाळाभाऊ भेगडे असतील यांनी देखील मदत केली. आज त्यांना सोडून इकडे येत असताना मी त्यांच्यावर टीका केली नाही.’
