AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 6 टक्क्यांपर्यंत व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 सर्वोत्तम मुदत ठेव योजनाही जाणून घ्या

या यादीत इंडसईंड बँक सर्वात अग्रस्थानी आहे. ही बँक सर्वसामान्य गुंतवणुकदाराला 6 टक्के दराने मुदत ठेवीवर व्याजदर देत आहे. 10 हजार रुपये एक वर्ष मुदत ठेव योजनेत ठेवल्यास ही बँक कालावधी संपल्यानंतर 10,613 रुपये रक्कम व्याजसहित देते. त्यानंतर आरबीएल बँकाचा क्रमांक लागतो. या बँकेचा व्याजदर ही 6 टक्के आहे.

एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 6 टक्क्यांपर्यंत व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 सर्वोत्तम मुदत ठेव योजनाही जाणून घ्या
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 10:40 AM
Share

मुंबई: मुदत ठेव ही सर्वात सुरक्षित आणि हमखास परताव्याची गुंतवणूक योजना म्हणून ओळखली जाते. बँक एफडी (FD) आपल्याला गरजेच्यावेळी खर्चाची उभारणी करण्यास मदत करु शकतात. त्यामुळे गुंतवणुकदार भविष्यातील मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वा उद्दिष्ट गाठण्यासाठी तसेच  सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी (Retirement planning) मुदत ठेवींमध्ये पैसे जमा करतात. ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक पैसे एफडीमध्ये(Senior citizen FD)  गुंतवतात. त्यातही निवृत्त लोकांचे पैसे जास्त आहेत. ही गुंतवणूक लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांवर सामान्य दरापेक्षा जास्त व्याज  दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वच बँका ही सुविधा पुरवितात. त्यामागे सामजिक देयत्वाची भावना असते.  सामान्य ठेवीदारांना १ वर्षांच्या एफडीवर किती व्याज मिळते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दर किती आहे हे जाणून घेऊयात.

मुदत ठेव योजनेत पूर्णत्व कालावधी अथवा ठेवीची मुदत वेगवेगळी असू शकते.  7 दिवस ते सुमारे 10 वर्षांसाठी मुदत ठेव योजना असते.  जेव्हा अल्पकालीन एफडीचा विचार केला जातो, तेव्हा त्याचा कालावधी  7 दिवस ते 12 महिन्यांपर्यंत असू शकते. ठेव योजनेची मुदत आणि त्यावरील व्याजदर याविषयी प्रत्येक बँकेचे धोरण वेगळे आहे. त्यामुळे मुदत ठेव योजनेत गुंतवणुक करण्यापूर्वी संबंधित बँकेचे दरपत्रक आणि कालावधी याची संपूर्ण माहिती आवश्य घ्या. कोणत्या बँकेत कालावधीनुसार किती परतावा मिळत आहे ते पहा. त्यानुसार एफडीमध्ये गुंतवणूक करावी.

एफडी घेण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

बँका आपल्याला ज्या दराने सध्या मुदत ठेव योजनेत परतावा देत आहे  ते भविष्यात बदलू शकतात. व्याजदर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. कारण रिझर्व्ह बँक ठेवींच्या योजनांचा दर निश्चित करते.  आर्थिक पुनरावलोकन करुन बँक दर जाहीर करते. बँका आरबीआयच्या दराच्या आधारे  एफडीचा दर कमी किंवा वाढवू शकतात. वर्षभराच्या कालावधीत सर्वाधिक व्याज देणाऱ्या एफडीबद्दल जाणून घेऊयात

कोणती बँक किती व्याज देत आहे

मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज देण्यात काही बँका अग्रेसर आहेत. या यादीत इंडसईंड बँक सर्वात अग्रस्थानी आहे. ही बँक सर्वसामान्य गुंतवणुकदाराला 6 टक्के दराने मुदत ठेवीवर व्याजदर देत आहे. 10 हजार रुपये एक वर्ष मुदत ठेव योजनेत ठेवल्यास ही बँक कालावधी संपल्यानंतर 10,613 रुपये रक्कम व्याजसहित देते. त्यानंतर आरबीएल बँकाचा क्रमांक लागतो. या बँकेचा व्याजदर ही 6 टक्के आहे.10 हजार रुपये एक वर्ष मुदत ठेव योजनेत ठेवल्यास ही बँक कालावधी संपल्यानंतर 10,613 रुपये रक्कम परतावा म्हणून देत आहे. त्यानंतर डीसीबी बँक 5.55 टक्के व्याज देत आहे. 10,000 रुपये गुंतवणुकीवर 10,566 रुपयांचा परतावा मिळत आहे. बंधन बँक मुदत ठेवीवर 5.25 टक्के व्याज देत आहे. या बँकेत 10,000 रुपये एफडी केल्यास 10,535 रुपये परतावा मिळतो. या यादीत 5 व्या स्थानी आयडीएफसी बँक आहे. ही बँक मुदत ठेवीवर 5.25 व्याज देते. 10 हजार रुपयांवर ही बँक 10,535 रुपये परतावा देते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहेत दर

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक बँक जास्त व्याज देते. 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर इंडसईंड बँक 6.5 टक्के व्याज देते. 10 हजारांच्या गुंतवणुकीवर 10,666 रुपयांचा परतावा मिळतो. आरबीएल बँक ही ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.5 टक्के व्याजदराने परतावा देते. डीसीबी बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर 6.05 टक्के व्याज देते. या बँकेत 10 हजार रुपये गुंतवणूक केल्यास 10,618 रुपये परतावा मिळतो. तर बंधन बँक या श्रेणीत 6 टक्के व्याज देते. 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ही बँक एक वर्षानंतर 10,613 रुपये देते. अॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर  5.75 टक्के व्याज देत आहे. बँक 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 10587 रुपये परतावा देईल.

अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने एफडीचे दर वाढवले आहेत. पण एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेत या बँका यादीत कुठेच नाही. 1 वर्षांच्या एफडीवर केवळ छोट्या बँकाच अधिक  व्याज देत आहेत. एसबीआयने 15 जानेवारी 2022 पासून आपले नवीन दर जाहीर केले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना  मुदत ठेवीवर  5.1 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 5.6 टक्के व्याज देत आहे.

संबंधित बातम्या :

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची डिजिटल भरारी, उघडली 5 कोटी खाती; देशभरातील 1.36 लाख कार्यालयांतून उद्दिष्ट साध्य

स्वस्तात घर खरेदीची ‘अशी’ संधी पुन्हा नाही, PNB करणार देशभरात ताब्यातील घर आणि मालमत्तांचा लिलाव

Post Office Savings Scheme : दर महिन्याला गुंतवा 1,411 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपयांचा परतावा

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....