Kangana Ranaut | कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार

मुंबईतील राजभवन येथे कंगना रनौत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.(Kangana Ranaut to meet Governor Bhagat Singh Koshyari)

Kangana Ranaut | कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 10:36 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर ट्विटच्या मालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता कंगना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. उद्या (12 सप्टेंबर) मुंबईतील राजभवन येथे कंगना रनौत आणि राज्यपालांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजता ही भेट होणार असल्याचे बोललं जात आहे. (Kangana Ranaut to meet Governor Bhagat Singh Koshyari)

दरम्यान काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशी प्रतिक्रिया राज्यपालांनी दिली होती. यानंतर आता कंगना स्वत: राज्यपालांना भेटणार आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कंगना रनौतची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले. “कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मेहता यांना सांगितले” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ड्रग्जचा आरोप ते हक्कभंग

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला जात आहे. तर कंगनाविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.

कंगनाकडून ऑफिसच्या तोडकामाची पाहणी 

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसच्या पाडकामाची पाहणी केली. (Kangana Ranaut to meet Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.