BEST BUDGET | तुटीच्या अर्थसंकल्पातही घोषणांचा ‘बेस्ट’ पाऊस, वीज विभागही तोट्यात

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे बेस्ट उपक्रमाचा 2021-22 वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. बेस्टचा वीज विभागही आगामी वर्षात तोट्यात जाण्याचा अंदाज आहे.

BEST BUDGET |  तुटीच्या अर्थसंकल्पातही घोषणांचा 'बेस्ट' पाऊस, वीज विभागही तोट्यात
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 8:22 PM

मुबंई : बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे बेस्ट उपक्रमाचा 2021-22 वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, सादर झालेला अर्थसंकल्प बेस्ट उपक्रम व समिती अध्यक्षांसह सदस्यांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असला तरी भविष्यात बेस्ट उपक्रमाची गाडी रुळावर आणण्यासह प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमांच्या सेवांबाबत आशादायी ठरणाऱ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. (BEST proposed deficit budget for next economic year)

बेस्टचा वीज विभागही तोट्यात

बेस्ट उपक्रमाचा सन 2021-22 या वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प 1887.83 कोटी तुटीचा मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांचा फायदा करून देणारा बेस्ट उपक्रमाचा वीज विभागही तोट्यात गेला असून ही तूट 263.59 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. परिवहन विभागाची तूट 1624.24 कोटी इतकी अंदाजिली आहे. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षात बेस्टचा व्यवहार तोट्यातच चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अर्थसंकल्पीय वर्षात विद्युत विभागाचे उत्पन्न 3532.30 कोटी तर खर्च 3765.89 कोटी इतका होणार आहे, त्यामुळे वीज विभागाची निव्वळ तूट 253.59 कोटी येणार आहे. परिवहन विभागाचे उत्पन्न 1407 कोटी अंदाजित आहे तर खर्च 3031.24 कोटी इतका होणार आहे. त्यामुळे निव्वळ तोटा 1624.24 कोटी इतका होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक वीजमापकांची पुनःस्थापना

गेल्या २ वर्षामध्ये मोठया प्रमाणामध्ये पारंपारिक पध्दतीची सुमारे २ लाख वीजमापके बदलून नवीन इलेक्ट्रॉनिक पध्दतीची वीजमापके बसवण्यात येतील, असे अर्थसंल्पात म्हटले आहे.

बसेसच्या संख्येत वाढ

ऑक्टोबर २०२० मध्ये बेस्ट उपक्रमाकडे ३८७५ बसगाड्यांचा ताफा आहे . ज्यामध्ये १०९९ भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे . या व्यतिरीक्त ३०० विद्युत बसगाड्यांचा खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ६०० एकमजली सीएनजी बसगाड्यांकरीता निविदा प्रक्रिया कार्यरत आहे. पहिल्या टप्प्यात उपक्रमाचा एकूण बसताफा ३१ मार्च २०२२ पर्यंत ६३३७ इतका करण्याचे प्रस्तावित आहे . त्याच प्रमाणे बसस्थानके ,बसचौक्या , बसथांब्यावर प्रवासी माहिती प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विविध बसस्थानके , बसचौक्या च बसथाचे मिळून एकूण ८०० ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली अंतर्गत प्रवाश्यांना उपक्रमाच्या बससेवेची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये बसगाडीची बसथांब्यावर येणारी अपेक्षित वेळ प्रवाशाला समजू शकेल.

भारत सरकारने देशातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्राकरिता ‘ नैशनल कॉमन मोबीलिटी कार्ड ( NCMC ) एक राष्ट्र – एक कार्ड हो योजना राबविण्याचे ठरविलेले आहे. सदर कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्राला लागू असेल . उदा . रेल्वे , बसेस , मोनोरेल . मेट्रोरेल व बेस्ट उपक्रम देखिल या योजनेत सहभागी असल्या कारणाने , प्रायोगिक तत्वावर ही योजना कुलाबा व वडाळा आगारात ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात आली आहे, असेही बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड

मुंबईकरांसाठी खुशखबर, मुंबईत 685 बेस्ट बसच्या 2 हजार फेऱ्या

(BEST proposed deficit budget for next economic year)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.