AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे पडसाद, बीएमसीबाहेर व्हेंटिलेटर-ऑक्सिजनसह दोन रुग्णवाहिका तैनात

पालिकेने खास कर्मचाऱ्यांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनसह दोन रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत (BMC deploy two well equipped ambulance).

कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे पडसाद, बीएमसीबाहेर व्हेंटिलेटर-ऑक्सिजनसह दोन रुग्णवाहिका तैनात
| Updated on: Aug 02, 2020 | 9:31 AM
Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा वेळेत रुग्णवाहिका न भेटल्याने मृत्यू झाला. यानंतर आता पालिकेने खास कर्मचाऱ्यांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनसह दोन रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत (BMC deploy two well equipped ambulance). रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महापालिका मुख्यालयाच्या चिटणीस कार्यालयातील या कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी (30 जुलै) निधन झालं होतं. यानंतर पालिका आरोग्य यंत्रणेवर सडकून टीका झाली होती.

रुग्णवाहिकेच्या अभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर चहूबाजूंनी टीका झाली. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका प्रशासनात उमटले. कोरोनाच्या काळातही मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात हजारोच्या संख्येने कर्मचारी-अधिकारी काम करत आहेत. असं असताना साध्या रुग्णवाहिकेचीही व्यवस्था नसावी, यावर आक्षेप घेण्यात आला. याची गंभीर दखल घेत आता व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधेसह 2 रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पालिका मुख्यालयाच्या चिटणीस कार्यालयातील संबंधित कर्मचारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयात काम करीत होते. कामावर असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याबाबत आपत्कालीन विभागाला कळवल्यानंतरही रुग्णवाहिका येण्यास अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला. यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि महापौर यांचे दालन आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध समित्यांचे अध्यक्ष आदींचे कार्यालयही आहेत. येथे दररोज हजारोंच्या संख्येने कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक येत असतात. त्यामुळे अशी एखादी घटना घडल्यास तात्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका असणे अपेक्षित आहे. मात्र, तशी व्यवस्थाच नसल्याचं या मृत्यूने उघड झालं. याची दखल घेऊन मुख्यालयातील दवाखान्यात अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा :

Rajesh Tope Mother Died | कोरोना वॉरियर पोरका झाला! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन

घेत होता भरारी उंच नभात, पण कुठेतरी आभाळ फाटलं, महापौर पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन

BMC deploy two well equipped ambulance

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.