आशिष शेलारांची विनंती, बाळासाहेब थोरातांचं सावरकरांना अभिवादन

सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडीतील दरी वाढवण्याबाबत भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

Balasaheb Thorat Tributes Sawarkar, आशिष शेलारांची विनंती, बाळासाहेब थोरातांचं सावरकरांना अभिवादन

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आदरांजली वाहिली. भाजप नेते आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर विधीमंडळात ठेवलेल्या सावरकरांच्या प्रतिमेवर थोरातांनी पुष्पांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. (Balasaheb Thorat Tributes Sawarkar)

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत उभारणीमध्ये किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सावरकरांचं मोठं योगदान आहे, त्यांचा आदर केला पाहिजे, विरोधकांनी गदारोळ केला, तरी काम होणारच विरोधकांनी काय करावं, हा त्यांचा अधिकार आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली.

भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव-सन्मानदर्शक ठराव विधिमंडळात मांडल्यावर काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडीतील दरी वाढवण्याबाबत भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्वातंत्र्यावीर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात भाजप आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडे भाजपने दिलेला प्रस्ताव नाकारला गेला असला, तरी भाजप ठराव मांडण्यावर ठाम आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव विधिमंडळात आणण्याचा आग्रह भाजपने धरला होता. मात्र सत्ताधारी पक्षांनी त्याला नकार दिल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली होती.

शिवसेना सत्तेच्या लोभापायी सावरकरांचा अपमान सहन करत आहे, अशी टीका मंगळवारी आझाद मैदानावरच्या भाषणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. (Balasaheb Thorat Tributes Sawarkar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *