भुजबळ स्वगृही परतणार का, उद्धव ठाकरे म्हणतात, “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल"

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भुजबळ स्वगृही परतणार का, उद्धव ठाकरे म्हणतात, “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल"

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत ( Shiv Sena) परतणार असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची शिवसेनेतल्या नेत्यांशी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र भुजबळांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हणत शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळलं.

दरम्यान, भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या या सूचक वक्तव्यानंतर भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या शक्यता पुन्हा जोर धरु लागल्या आहेत. खरंच छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत परतणार का हा एकच प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे.

भुजबळांच्या प्रवेशावरुन शिवसेनेत मतभेद

दरम्यान, छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या नुसत्या चर्चांवरुन शिवसेनेत मतभेद सुरु झाले आहेत. भुजबळांना प्रवेश देऊ नये असा म्हणणारा शिवसेनेतला गट सक्रिय झाल्यामुळं भुजबळांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र भुजबळांनी या वृत्तांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं.

28 वर्षांपूर्वी भुजबळांनी शिवसेना सोडली

छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरु झाली. 1947 ला जन्मलेल्या भुजबळांनी 1960 च्या दशकात शिवसेनेतून कामाला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेच्या विचारशैलीमुळे तरुण वयात भुजबळ शिवसेनेत दाखल झाले.

छगन भुजबळ 1973 मध्ये शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेत निवडून गेले. 1973 ते 1984 दरम्यान भुजबळांनी महापालिकेत दमदार काम केल्यानंतर ते मुंबईचे महापौर बनले.

1985 मध्ये भुजबळ माझगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990 मध्ये ते पुन्हा निवडून आले.  मात्र 1991 मध्ये शिवसेनेतील मतभेदानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसचा हात पकडला.

भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर भुजबळ शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले.

संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी?  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *