Hathras Case | हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबाची अवस्था वेदनादायी – जितेंद्र आव्हाड

मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, रातोरात त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येते. हे सगळं मन व्यथित करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणले. (Jitendra Awhad comment on Hathras Case)

Hathras Case | हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबाची अवस्था वेदनादायी - जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 6:20 PM

मुंबई: एका मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, रातोरात त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येते. हे सगळं मन व्यथित करणार, यातना देणार आहे. इतक्या क्रूरपणे प्रशासनाने वागावं हे योग्य नाही, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. हाथरस प्रकरणी सरकार बोलायला तयार नाही, सरकारची माणसं तिथे जायला तयार नाहीत. कुटुंबाला विळखा घालून त्यांना बंद करण्यात आले. दलित कुटुंबाची आजच्या युगामध्ये ही अवस्था वेदनादायी आहे, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या. (Jitendra Awhad comment on Hathras Case)

हाथरस प्रकरणी आम्हाला माध्यमातून माहिती मिळाली आहे. त्यामधून सध्या परिस्थिती भयानक दिसत आहे. राष्ट्रपती लागवट , राजीनाम्याची अथवा सरकार बरखास्त करण्याची मागणी करून काही फायदा नाही, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. आता सुरु आहे त्यापेक्षा आणखी जोराने त्या ठिकाणी हुकुमशाही करण्यात येईल. तिथे लहान जाती आणि तिथल्या शोषितांबद्दल प्रेम आपुलकी असल्याचे अजिबात नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

इंदिरा गांधींची आठवण

बिहारमध्ये यापूर्वी एक हत्याकांड झाले होते. इंदिरा गांधी त्यावेळी सत्तेत नव्हत्या. मात्र, त्या ठिकाणी गेल्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी जिद्द ठेवून त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी आसपासच्या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी जमले होते. इंदिरा गांधींनी त्या लोकांना भाषण द्यायला आली नसून पीडित कुटुबांचे अश्रू पुसण्यासाठी आली आसल्याचे सांगितले. यानंतर देशातील वातावरण बदललं आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. हाथरस प्रकरणाने देशातील वातावरण बदलले आहे. ज्या पद्धतीचं वर्तन सत्ताधाऱ्यांचा आहे त्यानुसार सत्ते पुढे काही चालू शकत नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या भावनेचे उत्तर जनतेच्या मनात असत जनताच योग्य वेळेला योग्य उत्तर देईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत यूपी पोलिसांनी केलेल्या वर्तनाबद्दल बोलताना म्हटले.

मुंबई पोलीस अनं महाराष्ट्राच्या बदनामीची गरज नव्हती

मुंबई पोलीस सुशांतच्या रिपोर्ट मध्ये काही लपवतील अशी शक्यता अजिबात नव्हती. तेच सत्य आता समोर आलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही. मुंबईने आपल्याला भरभरून दिलं आहे. मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्राला एवढं बदनाम करायची गरज नव्हती, असं आव्हाड म्हणाले आहेत. याप्रकरणी कोणाकडूनही माफीची अपेक्षा नाही. सुशांत प्रकरणात महाराष्ट्राचा अपमान ज्या पद्धतीने केला गेला ते महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणाऱ्यांना अजिबात आवडलं नसल्याचं, जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

पुढील एक महिना मुंब्य्रात कार्यक्रमाला येणार नाही : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली, पोलिसांना 567 घरं मिळणार

(Jitendra Awhad comment on Hathras Case)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.