AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या भाईगिरीविरोधात कोर्टात जाणार, मुंडण प्रकरणावरुन किरीट सोमय्या आक्रमक

शिवसेनेचा पोलिसांवर दबाव असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

शिवसेनेच्या भाईगिरीविरोधात कोर्टात जाणार, मुंडण प्रकरणावरुन किरीट सोमय्या आक्रमक
| Updated on: Dec 24, 2019 | 2:32 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीचं मुंडण केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. शिवसेनेची भाईगिरी सुरु झाली असून अशा प्रकारे मुंडण करणे (Kirit Somaiya on FB User Mundan), हा शिवसैनिकांचा धंदा आहे का? असा सवाल सोमय्यांनी विचारला आहे.

शिवसेनेचा पोलिसांवर दबाव असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची राज्यावरची आणि पक्षावरची पकड आता ढिली होत आहे. अशा प्रकारे मुंडण करणे, हा त्यांचा धंदा आहे का? असा प्रश्न सोमय्यांनी विचारला.

या प्रकरणातील पीडितालाच पोलिसांनी नोटीस दिली आहे. सायबर ब्रांचला सामील करुन का घेतलं नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेची ही भाईगिरी सुरु झाली आहे, मात्र आम्ही अशी गुंडगिरी थांबवणार आहोत. आम्ही सामान्य लोकांसोबत असून न्यायालयात जाण्याचा इशाराही सोमय्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या पक्षाला दहशत आणि दरारा याच्यातील फरक समजून सांगावा, असा सल्लाही सोमय्यांनी दिला.

उद्धव ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, शिवसैनिकांकडून तरुणाचं मुंडण

दरम्यान, आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, आम्ही या गोष्टीचे समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी दिलं आहे. पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. मात्र सोशल मीडियावर लिहिण्याऱ्यांनी आपण काय लिहितो, याचं भान ठेवावं, असंही सातमकर म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने शिवसैनिकांनी हिरामणी तिवारी यांचे केस कापून चक्क टक्कल करत, अवहेलना केली होती. रविवार 22 डिसेंबरला दुपारी ही घटना घडली होती.

हिरामणी तिवारी वडाळ्यातील रहिवाशी आहेत. हिरामणी यांची फेसबुक पोस्ट वाचून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट त्यांच्या घराकडे कूच केली. इतकंच नाही तर हिरामणी यांना मारहाण करुन, त्याचे केस कापले.

उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठातील मारहाणीची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्याविरोधात हिरामणी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मुंडण आणि मारहाणीच्या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना 149 ची नोटीस पाठवली आहे.

हिरामणी तिवारी हे बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं. दादरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाला हिरामणी तिवारींनी हजेरी लावली होती. Kirit Somaiya on FB User Mundan

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.