'मिशन शक्ती'ची तयारी 2012 पासूनच, भारत एक पाऊल निश्चित पुढे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: भारताने मिशन शक्ती यशस्वी करुन अंतराळात दबदबा निर्माण केला. भारतीय वैज्ञानिकांनी 300 किमी अंतराळात वर केवळ 3 मिनिटात एक लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आल्याची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण …

'मिशन शक्ती'ची तयारी 2012 पासूनच, भारत एक पाऊल निश्चित पुढे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: भारताने मिशन शक्ती यशस्वी करुन अंतराळात दबदबा निर्माण केला. भारतीय वैज्ञानिकांनी 300 किमी अंतराळात वर केवळ 3 मिनिटात एक लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आल्याची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं.

“ही अभिमानास्पद कामगिरी आहे. 2012 सालीच याबाबत आम्ही तयारी केली होती. पण अशी चाचणी झाली नव्हती. ती चाचणी करायची की नाही तो राजकीय निर्णय होता” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

नरेंद्र मोदी आज काहीतरी मोठी घोषणा करणार असं वाटत होतं. पाकिस्तानातून कोणीतरी पकडून आणलं आहे की काय असं आम्हाला वाटत होतं, पण तसं झालं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

मोदींच्या टायमिंगबद्दल मी बोलणार नाही. तांत्रिक यश नक्की आहे. सरकारला प्राथमिक गोष्टीबद्दल विचार करायची गरज आहे. भारताचं एक पाऊल निश्चित पुढे आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

मी अंतरीश आयोगाचा सदस्य राहिलो आहे, मी सर्व कामं जवळून पाहिली आहेत. अँटि सॅटेलाईट मिशनची चाचणी महत्त्वाची आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

मिशन शक्ती यशस्वी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचं मिशन शक्ती यशस्वी झाल्याची माहिती दिली. “आमच्या वैज्ञानिकांनी अंतराळात 300 किमी दूर LEO (Low Earth Orbit) मध्ये एका लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आलं.काही वेळापूर्वी भारताने मोठं यश मिळवलं आहे. भारताने अंतराळात हे यश मिळवलं. अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरला, असं मोदी म्हणाले.

भारतीय वैज्ञानिकांनी या मिशनअंतर्गत सर्व लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. या मोहिमेसाठी भारतीय बनावटीच्या सॅटेलाईटचा वापर करण्यात आला होता.

संबंधित बातम्या 

मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी  

आधी ट्वीट, मग भाषण… मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल  

‘मिशन शक्ती’बाबत नरेंद्र मोदींचं भाषण जसंच्या तसं, त्यांच्याच शब्दात 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *