Mumbai Bed Availability | मुंबईत 40 % ऑक्सिजन बेड, 210 ICU बेड, 126 व्हेंटिलेटर रिक्त

मुंबईत सध्या केवळ 210 आयसीयु खाटा रिक्त आहेत. तर, 126 व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास आगामी काळात आयसीयु आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

Mumbai Bed Availability | मुंबईत 40 % ऑक्सिजन बेड, 210 ICU बेड, 126 व्हेंटिलेटर रिक्त

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण खाटांपैकी जवळपास 50 टक्के खाटा रिकाम्या आहेत (Mumbai Bed Availability), अशी माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर 40 % ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याचंही त्यांनी सांगितलं (Mumbai Bed Availability).

मुंबईत फक्त 210 आयसीयु बेड

मात्र, मुंबईत सध्या केवळ 210 आयसीयु खाटा रिक्त आहेत. तर, 126 व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास आगामी काळात आयसीयु आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये सीसीसी 1 प्रकारातील एकूण 17698 खाटांपैकी केवळ 2332 खाटांवर रुग्ण आहेत. तर सीसीसी 2 प्रकारातील 2918 खाटांपैकी 1769 खाटांवर रुग्ण आहेत.

जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये गरज पडल्यास अतिरीक्त 44 हजार खाटा तात्काळ कार्यान्वित केले जाऊ शकतील अशी सुविधा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोव्हिड रुग्णालयांमधील एकूण 17,724 खाटांपैकी 5931 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 8805 खाटांपैकी 2920 खाटा रिक्त आहेत. तर आयसीयु 1786 खाटांपैकी 210 बेड रिक्त आहेत. तर व्हेंटिलेटर 1119 खाटांपैकी 126 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.

Mumbai Bed Availability

संबंधित बातम्या :

‘घाबरुन जाऊ नका’, मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

“बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का?” संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल

कोरोनाग्रस्त आई-वडील रुग्णालयात, पोलिसांकडून घरी जाऊन चिमुरड्याचा बर्थडे सेलिब्रेट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *