देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना वारंवार काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही, असं म्हटलं आहे. (Sanjay Raut said MVA govt take care of  Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना वारंवार काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही, असं म्हटलं आहे. परिस्थिती किती गंभीर आहे, हे आज फडणवीसांना समजले असेल. फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो,असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut said MVA govt take care of  Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला सूचना दिल्या असल्याची माहिती राऊत यांनी दिली. देवेद्रं फडणवीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, असंही राऊत म्हणाले.
शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात होतो आहे. कोरोना नसता तर आज शिवतीर्थावर आज शिवसैनिकांचा महापूर दिसला असता.

मनाची आणि जनाचीही लाज आहे म्हणून दसरा मेळावा सभागृहात घेत आहोत. विरोधकांनी बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही पाळली नाही. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मेळावा घेतला. भागवत आमच्यासाठी आदर्श, पण संघाच्या मेळाव्याबाबत विरोध काय काय म्हणतील?

मुख्यमंत्री सीमोल्लंघन करणार आहेत, ते कोणत्या प्रकारचं हे संध्याकाळी समजेल. हिंदुत्व हे आमच्यासाठी लाखमोलाचे आहे.
मोफत कोरोना लसीवरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय राऊत यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लसीचं राजकारण करण्याएवढे कोत्या मनोवृत्तीचे नाहीत. नवाब मलिकांनी घोषणा केली असेल तर त्यांनी त्याबाबत चर्चा केली असेल, असं राऊत म्हणाले.

संंबंधित बातम्या :

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर समाजाने बहिष्कार टाकावा : संजय राऊत

VIDEO : ‘या’ बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय, संजय राऊतांची मागणी

(Sanjay Raut said MVA govt take care of  Devendra Fadnavis)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *