शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या व्हिडीओने ईशान्य मुंबईत खळबळ

मुंबई: शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या एका व्हिडीओने ईशान्य मुंबईत खळबळ उडाली आहे. नुकतंच एका खासगी कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी या कार्यक्रमाला व्यासपीठावर संजय पाटील हे उपस्थित होते. राऊत यांनी पाटील यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे वेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या …

, शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या व्हिडीओने ईशान्य मुंबईत खळबळ

मुंबई: शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या एका व्हिडीओने ईशान्य मुंबईत खळबळ उडाली आहे. नुकतंच एका खासगी कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी या कार्यक्रमाला व्यासपीठावर संजय पाटील हे उपस्थित होते.

राऊत यांनी पाटील यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे वेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर सुनील राऊत यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या खुलाशाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात राऊत म्हणतात, “कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता शिवसेना-भाजप युती अशी मजबूत राहील यासाठी काम करा. उमेदवार मनोज कोटक हे लाखोंच्या मतांनी जिंकून येतील. मी आपल्यासोबत आहे”.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप मध्ये तणाव होता. किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर स्वतः निवडणूक लढवण्याची धमकी वजा इशारा सुनील राऊत यांनी दिला होता.

शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे. पण मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील राऊत त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पण राऊत यांच्या सध्या वायरल होत असलेल्या व्हिडीओने ईशान्य मुंबईत युतीत पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर सुनील राऊत यांचे म्हणणे आहे की, “आपली मराठी संस्कृती आहे की आपल्या विरोधकांना शुभेच्छा देतो. तो एक खासगी कार्यक्रम होता. व्यासपीठावर संजय पाटील अचानक समोर आले आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यापलीकडे यात काहीही नाही.

आम्ही मनापासून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचे काम करीत आहोत”.

नेमका कार्यक्रम काय होता ?

भांडुप, सुभाष नगर इथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इमारत उभारणी प्रकल्पाचे भूमिपूजन होते. या प्रकल्पात राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याचा सहभाग असल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमाआधी ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांची उमेदवारी जाहीर झाली होती.

संबंधित बातम्या 

भाजप उमेदवार मनोज कोटक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर  

सोमय्यांच्या मतदारसंघात मनसेचं आजही प्राबल्य, प्रचाराला बोलावणार: राष्ट्रवादी   

राज्यातील सर्वपक्षीय 11 खासदारांचा पत्ता कट  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *