मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं.

मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 11:01 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते (Shivsena Vachanpurti Sohla). यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा हात धरुन सरकार का स्थापन केलं, यावर भाष्य केलं. तसेच, भाजपने मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. पण मी मी नुसता उद्धव ठाकरे नाही, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही तर लढणारा आहे, असं म्हणत भाजपला खडसावलं (CM Uddhav Thackeray On BJP).

“मी शिवसेनाप्रमुखांचा हात हातात घेऊन जी शपथ घेतली. तो त्यांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची घेतली आहे. ही जबाबदारी मी जरुर स्वीकारली. ती एवढ्यासाठी की, ज्यावेळी आपल्या तेव्हाच्या मित्रपक्षाने (भाजप) दिलेलं वचन मोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत त्या मंदिरात दिलेला शब्द खाली पाडला. असं काही ठरलंच नव्हतं म्हणून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. ‘मी नुसता उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.’ मी डरणारा नाही लढणारा आहे”, असं म्हणत भाजपने त्यांचा शब्द पाळला नाही हे उद्धव ठाकरेंनी पुन्हा बोलून दाखवले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “कुटुंबप्रमुख म्हटल्यावर मी जे बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला काय तोंड दाखवलं असतं. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना असती की, शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलतोय. हे कदापी होणं नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही. म्हणून मी हा वेगळा मार्ग स्वीकारला. हो कारण जे 25 किंवा 30 वर्षे आपले विरोधक होते. त्यांचा हातात हात घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणे केलं. चोरुन मारुन केलेले नाही. याचा अर्थ मी भगवा खाली ठेवला असा नाही. ना आमचा रंग आम्ही बदलला ना आमचा अंतरंग आम्ही बदलला. आमचा अंतरंगही भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे”.

शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा

आज (23 जानेवारी) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 11 ज्येष्ठ शिवसैनिकांनी सत्कार केला. या सत्कार सभारंभापूर्वी अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. अवधुत गुप्ते, अभिजित केळकर, मयुरेश पेम, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांसह अनेक कलाकारांचे मनोरंजनपर कार्यक्रम झाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.