मुंबईत मिठी नदीखालून मेट्रो धावणार

मुंबई : अत्यंत आव्हानात्मक असलेला मेट्रो 3 प्रकल्प आता आणखी एका महत्त्वाच्या आव्हानाचा सामना करणार आहे. मिठी नदीच्या पात्राखालून या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कोलकात्यात हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा मिठी नदी पात्राखालचा असेल. कुलाबा वांद्रे सीप्झ हा मेट्रो भूमिगत असल्याने या प्रकल्पाचे काम प्रारंभीपासूनच आव्हानात्मक राहिले आहे. …

मुंबईत मिठी नदीखालून मेट्रो धावणार

मुंबई : अत्यंत आव्हानात्मक असलेला मेट्रो 3 प्रकल्प आता आणखी एका महत्त्वाच्या आव्हानाचा सामना करणार आहे. मिठी नदीच्या पात्राखालून या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कोलकात्यात हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा मिठी नदी पात्राखालचा असेल. कुलाबा वांद्रे सीप्झ हा मेट्रो भूमिगत असल्याने या प्रकल्पाचे काम प्रारंभीपासूनच आव्हानात्मक राहिले आहे.

या प्रकल्पातील दोन बोगदे आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा धारावी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हा 1.8 किमीचा पट्टा नदीखालून जाणार आहे. म्हणजेच या पट्ट्यात नदीखालून बोगदा खोदला जाणार आहे. फेब्रुवारी 2019 पासून बोगदा खोदण्याचे काम सुरू होईल. हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या खोदकामासाठी ऑस्ट्रेलियन पद्धतीचा वापर केला जाईल. कॉम्प्लेक्स ते धारावीदरम्यान बोगद्याचा काही भाग नदीखाली तर खाली भाग तिवरांच्या खाली असेल. बोरिंग यंत्रे या दोन टनेलचे खोदकाम करतील.

मेट्रोच्या मार्गात अन्य ठिकाणी बोगदे असणार आहेत. त्यापैकी एक कुलाब्याकडे येणाऱ्या गाडीसाठी असेल, तर दुसरा सीप्झकडे जाणाऱ्या गाडीसाठी. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मेट्रोचे टर्मिनल उभारले जाणार असल्याने तिथे तीन बोगदे असतील. काही गाड्या बीकेसी येथे येतील आणि पुन्हा तेथून माघारी फिरतील. या गाड्यांसाठी तिसरा बोगदा असेल. त्याशिवाय धारावी ते बीकेसी दरम्यान एखादी गाडी बंद पडली, तर तिसऱ्या बोगद्यात बांधण्यात येणाऱ्या ट्रॅकवरून बंद पडलेली गाडी बीकेसी टर्मिनलमध्ये आणली जाईल, अशी योजना आहे.

या प्रकल्पात आतापर्यंत एकूण 17 कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे बोगदे खणून झाले आहेत. बोगदे खोदण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी 17 टनेल बोरिंग मशीन कार्यरत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *