जगात पुन्हा मुंबई महापालिकेचा डंका, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह बीएमसीबद्दल गौरवोद्गार

पुन्हा एकदा जागतिक स्तरावर धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचं कौतुक झालं आहे (Washington Post praise BMC for Corona prevention).

जगात पुन्हा मुंबई महापालिकेचा डंका, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह बीएमसीबद्दल गौरवोद्गार
Follow us
| Updated on: Aug 02, 2020 | 10:33 AM

मुंबई : पुन्हा एकदा जागतिक स्तरावर धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचं कौतुक झालं आहे (Washington Post praise BMC for Corona prevention). अनेक आव्हानं असतानाही मुंबई महानगरपालिकेने अत्यंत परिणामकारकपणे कोरोना विषाणूचा सामना केला, असे गौरवोद्गार जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वृतपत्र असलेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने काढले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्याचं मोठं आव्हान जगासमोर असताना आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत या विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासन यशस्वी झालं आहे.

याआधी मुंबई महानगरपालिकेने धारावीसह मुंबईतील कोरोना नियंत्रणासाठी उभारलेल्या लढ्याचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं होतं. यानंतर आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने देखील या कामाची दखल घेत गौरव केला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना यश आल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी या यशाने हुरळून न जाता यापुढेही कोरोनाविरुद्धचा लढा सुरु राहील, असा निर्धार मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी पारदर्शक असून पालिकेचे काम परिणामकारक असल्याचं मत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या लेखातून व्यक्त केलं. त्यानंतर आता पुन्हा धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला आलेल्या यशाचं कौतुक या वृत्तपत्राने शुक्रवारी (31 जुलै) विशेष लेखातून केलं. धारावीमधील कोरोना विरोधातील लढ्याने दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या अन्य शहरांसाठी आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुक या लेखात करण्यात आले आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, मुंबईतील रुग्ण संख्या सध्या 1 लाखाच्या पुढे गेली आहे. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 पर्यंत 24 तासात बरे झालेले रुग्णांची संख्या 832 इतकी होती. आजवर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87,906 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 76 टक्के आहे. एकूण 20,749 रुग्ण अद्याप सक्रीय आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. दुप्पटीचा दर 77 दिवसांवर गेला आहे. कोविड वाढीचा दर 25-31 जुलै या काळात 0.91 टक्के इतका होता.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे पडसाद, बीएमसीबाहेर व्हेंटिलेटर-ऑक्सिजनसह दोन रुग्णवाहिका तैनात

Rajesh Tope Mother Died | कोरोना वॉरियर पोरका झाला! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन

घेत होता भरारी उंच नभात, पण कुठेतरी आभाळ फाटलं, महापौर पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन

Washington Post praise BMC for Corona prevention

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.