Ten NCPI MPs not reachable and absent from the meeting list of names revealed
गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराला वेग आला आहे, वेगवेगळ्या पक्षांमधून आमदार, खासदार बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत. आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराला वेग आला आहे, वेगवेगळ्या पक्षांमधून आमदार, खासदार बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ पैकी तब्बल सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली. या खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक खासदारांची संख्या झाली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधून तब्बल 20 खासदार बाहेर पडले, त्यांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
