मोदी कॅबिनेटचे निर्णय, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस, ई सिगरेटवर बंदी

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने (Modi cabinet decision) रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ई सिगरेटवर पूर्ण बंदी घालण्यात येणार आहे.

मोदी कॅबिनेटचे निर्णय, रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस, ई सिगरेटवर बंदी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने (Modi cabinet decision) रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस (Railway employee bonus) देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ई सिगरेटवर (E cigarettes) पूर्ण बंदी घालण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत (Modi cabinet decision) आज अनेक निर्णय घेण्यात आले. त्याबाबतची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

रेल्वेच्या 11 लाख 52 हजार कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. रेल्वेला त्यासाठी 2024 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

याशिवाय मोदी सरकारने ई सिगरेट कपवरही बंदी घातली आहे. भारतात ई सिगरेट बनवणं आणि त्याची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या “ई सिगरेटवर बंदी म्हणजे त्याचं उत्पादन, आयात-निर्यात, ट्रान्सपोर्ट, विक्री, वितरण आणि जाहिरत सर्वांवर बंदी असेल”.

जर कोणी ई सिगरेट विकताना आढळला तर नव्या नियमानुसार त्याला पहिल्या वेळी 1 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. जर दुसऱ्यांदा ती चूक झाली तर 3 लाख रुपयांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

ई सिगरेटचे 400 ब्रँड आहेत, मात्र भारतात कोणताही ब्रँड बनत नाही. रिपोर्टनुसार ई सिगरेटचे 150 फ्लेवर बाजारात उपलब्ध आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *