…तर 2029 पर्यंत पृथ्वीवरचे सर्व घड्याळं फेकून द्यावी लागणार, जगात पहिल्यांदाच घडली अशी घटना, शास्त्रज्ञही हैराण
जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. शास्त्रज्ञांकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

पृथ्वीची गती आता सामान्य राहिली नाहीये, शास्त्रज्ञांकडून पृथ्वीबाबत एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे, पृथ्वीची गती पूर्वीपेक्षा अधिक वाढली असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. सध्या हा बदल खूप सूक्ष्म स्थरावर आहे, मात्र त्याचा परिणाम हा खूप गंभीर आहे, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. पृथ्वीला आपली एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जवळपास 86,400 सेकंद लागतात. मात्र वेळेनुसार यामध्ये बदल होत असतात. मात्र हे बदल खूप सूक्ष्म असतात. परंतु आता शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की, पृथ्वीच्या गतीमध्ये वाढ झाली आहे. पृथ्वीची गती काही मिलीसेंकदांनी वाढली आहे. यामुळे दिवस छोटा होत चालला आहे.
शास्त्रज्ञांकडून या संदर्भात असा दावा देखील करण्यात आला आहे की, हे जर असंच सुरू राहिलं तर 2029 पर्यंत आपल्याला वेळेच्या मोजमापण पद्धतीमध्ये सुद्धा बदल करावा लागेल. जोपर्यंत पृथ्वीची गती ही नियंत्रणात होती, तोपर्यंत घड्याळामध्ये आपोआप लीप सेकंद जोडला जायचा, मात्र यावर्षी पहिल्यांदाच लीप सेकंद हटवण्याची वेळ येऊ शकते, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे, एक सेंकद हटवण्याची ही घटना तांत्रिक दृष्ट्या फार मोठं पाऊल असणार आहे.
तांत्रिकदृष्या घडाळ्यातून एक सेंकद हटवणं ही फार मोठी घटना असणार आहे, मात्र त्याचा परिणाम हा सामान्य लोकांच्या जीवनावर होणार नाही, सामान्य लोकांची दिनचर्या आहे तशीच राहील असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. मात्र याचा मोठा परिणाम हा पृथ्वीच्या कालचक्रावर होणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी एक नाही तर तीन सर्वात छोटे दिवस आले आहेत. 9 जुलै 2025, 22 जुलै 2025 आणि 5 ऑगस्ट 2025 हे तीन दिवस या वर्षातील सर्वात छोटे दिवस असणार आहे.
5 ऑगस्ट 2025 या दिवशी तर दिवस 1.51 मिलीसेकंद एवढा छोटा असणार आहे, हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असू शकतो. सामान्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही, मात्र पृथ्वीच्या कालचक्राच्या दृष्टीने हा धक्कादायक बदल असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.