AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लेटरबॉम्ब’ टाकणारे काँग्रेसचे 23 नेते जम्मूमध्ये एकत्र जमायला सुरुवात; राजकीय भूकंपाची शक्यता

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हे 23 बंडखोर नेते जम्मूमध्ये एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. | 23 Congress leaders Jammu

'लेटरबॉम्ब' टाकणारे काँग्रेसचे 23 नेते जम्मूमध्ये एकत्र जमायला सुरुवात; राजकीय भूकंपाची शक्यता
एकीकडे राहुल गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर असताना बंडखोर नेत्यांची ही एकजूट काँग्रेस पक्षासाठी चांगले लक्षण नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे नेते आता जम्मूत काँग्रेसच्या नेतृत्त्वाविरुद्ध उघडपणे आवाज उठवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
| Updated on: Feb 27, 2021 | 8:58 AM
Share

नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या (Congress G-23 leaders) सध्याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले आहेत. या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात संघटनात्मक बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी या सर्व नेत्यांना चांगलेच झापले होते. तर राहुल समर्थक नेतेही या 23 बंडखोर नेत्यांवर तुटून पडले होते. (Congress G-23 leaders will gather in Jammu)

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हे 23 बंडखोर नेते जम्मूमध्ये एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे नेते जम्मूमध्ये कोणती मोठी घोषणा करणार का? काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

लेटरबॉम्बमुळे चर्चेत आलेले हे 23 नेते काँग्रेसमधील ज्येष्ठ राजकारणी आहेत. यापैकी काहीजण राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्षात असून पक्षाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे आता या नेत्यांनी कोणताही निर्वाणीचा निर्णय घेतल्यास तो काँग्रेस पक्षासाठी जबर धक्का असेल.

हे नेते जम्मूत का जमत आहेत?

काही दिवसांपूर्वीच राज्यसभेत निरोप समारंभ पार पडलेले माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी या 23 नेत्यांना जम्मूत येण्याचे निमंत्रण दिले आहे. याठिकाणी “सेव द आइडिया ऑफ इंडिया” ही मोहीम लाँच करण्यात येणार आहे. हा काँग्रेस पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नाही. एकीकडे राहुल गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर असताना बंडखोर नेत्यांची ही एकजूट काँग्रेस पक्षासाठी चांगले लक्षण नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे नेते आता जम्मूत काँग्रेसच्या नेतृत्त्वाविरुद्ध उघडपणे आवाज उठवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जम्मूत आतापर्यंत कोणते नेते आले?

आतापर्यंत जम्मूत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, आनंद शर्मा, कपिल सिब्बल हे नेते पोहोचले आहेत. तर राज्यसभा खासदार विवेक तन्खा आणि मनिष तिवारी लवकरच जम्मूत दाखल होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळाले होते. अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या 23 ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. या नेत्यांनी नेतृत्त्वबदलाची मागणी केली होती. या सगळ्या नेत्यांना जाब विचारताना अशोक गेहलोत यांनी अत्यंत तिखट भाषेचा वापर केला. त्यामुळे आनंद शर्माही प्रचंड संतापले. त्यांनी अशोक गेहलोत यांना तितक्याच तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले.

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलन ते अर्थव्यवस्था, CWC बैठकीत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

(Congress G-23 leaders will gather in Jammu)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.